महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाच दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पटीहून अधिक वाढ

मुंबईत गेल्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटीहून अधिक वाढली असून मुंबईत आज नव्या 1031 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

number-of-corona-patients-in-mumbai-increased-more-than-doubled-in-five-days
पाच दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पटीहून अधिक वाढ

By

Published : Nov 21, 2020, 4:14 AM IST

मुंबई -मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा रुग्ण संख्या आटोक्यात आली. मात्र, आता पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. गेल्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटीहून अधिक वाढली आहे. मुंबईत आज नव्या 1031 रुग्णांची नोंद झाली असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत आज कोरोनाचे 1031 नवे रुग्ण आढळून आले असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 10 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 9 पुरुष तर 4 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 73 हजार 480 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 637 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 553 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 50 हजार 456 वर गेला आहे. सध्या मुंबईत 9 हजार 46 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 296 दिवसांवर -

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 296 दिवस, तर सरासरी दर 0.23 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 382 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 3 हजार 967 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 17 लाख 39 हजार 865 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या-

१६ नोव्हेंबर - ४०९ रुग्ण
१७ नोव्हेंबर - ५४१ रुग्ण
१८ नोव्हेंबर - ८७१ रुग्ण
१९ नोव्हेंबर - ९२४ रुग्ण
२० नोव्हेंबर - १०३१ रुग्ण

कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -

7 नोव्हेंबर -576 रुग्ण
2 नोव्हेंबर -706 रुग्ण
3 नोव्हेंबर -746 रुग्ण
6 नोव्हेंबर -792 रुग्ण
9 नोव्हेंबर -599 रुग्ण
10 नोव्हेंबर -535 रुग्ण
14 नोव्हेंबर -574 रुग्ण
16 नोव्हेंबर -409 रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details