महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक; एकट्या नागपुरात 23 जणांचा मृत्यू - महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या

कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आता मृत्युचे प्रमाणही वाढत असून रुग्ण दुपटीचा कालावधी घसरत चालला आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात आज 3,796 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 2977 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

मुंबई
मुंबई

By

Published : Mar 18, 2021, 7:59 PM IST

मुंबई- कोरोना रुग्णांची वाढती संख्या राज्याची चिंता वाढवणारी ठरत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आता मृत्युचे प्रमाणही वाढत असून रुग्ण दुपटीचा कालावधी घसरत चालला आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात आज 3,796 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 2977 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

मागील महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असताना मुंबईमधील रुग्ण दुपट्टीचा कालावधी झपाट्याने खाली घसरत आहे. ८ फेब्रुवारीला ५७४ वर गेलेला रुग्ण दुपटीचा कालावधी १६ मार्चला १४५ दिवसांवर आला आहे. गेल्या ३६ दिवसात रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४२९ दिवसांनी घसरला आहे. रोजच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असून १३ मार्चला १७०८ असलेल्या रुग्णांची संख्या १७ मार्चला तब्बल २३७७ वर पोहचली आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आव्हान उभे राहिले आहे.

नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांमध्ये कोरोनाबधितांचा आकडा 10 हजार पार झाला आहे. रोज 1500 ते 2000 नवीन रुग्णांची भर पडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे ओढवलेल्या आर्थिक मंदीचा अनुभव घेता प्रशासनाने यंदा काही नियम शिथिल करत निर्बंध लागू केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details