मुंबई:कोरोना रुग्ण शोधून काढण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातात. जितक्या चाचण्या अधिक तितके रुग्ण अधिक, चाचण्या कमी केल्यास रुग्णसंख्या कमी होते. मुंबईमध्ये मागील वर्षापर्यंत ६ ते ७ हजाराहून अधिक चाचण्या केल्या जात होत्या. कोरोना आटोक्यात आल्याने चाचण्या कमी करण्यात आल्या आहेत. आता सध्या १३०० ते १७०० चाचण्या केल्या जात आहेत. यामधून २०० ते ३०० रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना आटोक्यात असताना १ जानेवारी २०२३ ला २२०९ चाचण्या करण्यात आल्या. त्यामधून ४ रुग्ण आढळून आले. त्यानंतर चाचण्या कमी करण्यात आल्या.
२६ पटीने रुग्ण वाढले:२६ फेब्रुवारी रोजी १२१३ चाचण्या करण्यात आल्या. त्यामधून १२, २७ फेब्रुवारीला १२८२ चाचण्या करण्यात आल्या. त्यामधून २, २८ फेब्रुवारीला १८१९ चाचण्यांमधून १० रुग्ण आढळून आले होते. १ मार्चला १४८५ चाचण्यांमधून ८ रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागली. १५ मार्चला १८१२ चाचण्यांमधून ३१, १ एप्रिलला १३८७ चाचण्यांमधून १८९ तर १५ एप्रिलला १७६५ चाचण्यांमधून २६६ रुग्ण आढळून आले आहेत. २८ फेब्रुवारीला १० रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर गेल्या दीड महिन्यात १५ एप्रिल रोजी २६६ म्हणजे सुमारे २६ पटीहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.