महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Parkor Adventure Game : देशात पार्कोर रुजवणारा अस्सल मराठी पट्ट्या, एनएसजी कमांडोजना देतोय ट्रेनिंग

साहसी स्टंट करणारा ( Adventurous stuntman Deepak Mali ) आणि देशात पार्कोर रुजवणारा अस्सल मराठी तरुण दीपक माळी यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. परंतु या दीपक माळीला आता भारतीय सैन्याने एनएसजी कमांडोजना साहसी प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे आपण आज या दीपक माळी बद्दल जाणून घेणार आहोत.

By

Published : Mar 11, 2022, 5:53 PM IST

Updated : Mar 11, 2022, 8:12 PM IST

Deepak Mali
Deepak Mali

मुंबई : हॉलिवूड, बॉलीवूड आणि दक्षिणेकडच्या सैन्यांवर आधारित चित्रपटांमध्ये तुम्ही डोंगरावरून उड्या मारणे, इमारतीवरून उड्या मारणे, पळत जाऊन एका जिन्यावरून दुसऱ्या जिन्यावर उडी मारणे असे अनेक साहसी स्टंट पाहिले असतील. परंतु मूळचा सांगलीचा व सध्या मुंबईत राहणार दीपक माळी याने पार्कोर हा साहसी खेळ भारतात रुजवला आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय व त्याची इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड ( India World Record ) मध्ये नोंद झाली आहे. प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते की, त्याला सैन्यात भरती होता यावे. परंतु दीपकचे स्टंट पाहून त्याला भारतीय सैन्याने एनएसजी कमांडोजना साहसी प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित केले आहे. अशा या अस्सल मराठी पठ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

लहानपणापासून आवड -

दीपक हा मुळचा सांगली जिल्ह्यातील ( Deepak hails from Sangli district ) पारे गावचा रहिवासी. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उड्या मारणे, उंच ठिकाणावरून उड्या मारणे याची दिपकला लहानपणापासून आवड होती. मात्र, त्याच्या या उड्या मारण्याच्या प्रकाराला पार्कोर म्हणतात. हा एक साहसी खेळाचा प्रकार आहे हे त्याला माहिती नव्हतं. एक दिवस इंटरनेटवर व्हिडिओ पाहत असताना, त्याला या साहसी खेळाचे व्हिडिओ दिसले. त्यावेळी त्याला समजलं तो जे स्टंट करतो. ते साधे नसून तो एक आंतरराष्ट्रीय सहासी खेळाचा प्रकार आहे.

शिक्षण सॉफ्टवेअर इंजिनिअर पण पार्कोरमुळे ओळख -

दीपक हा उच्चशिक्षित असून, त्याचं बीएससी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झाले आहे. मात्र, या क्षेत्रात त्याचं मन लागत नाही. त्याने इंटरनेटवर व्हिडिओ पाहून या क्षेत्रात आपला दबदबा आणि ओळख निर्माण केली आहे.

अनेक चित्रपटांमध्ये स्टंट -

दीपकने आपल्या कलेचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओजमुळे तो अल्पावधीतच व्हायरल झाला. त्याचे हे टॅलेंट बघून त्याला अनेकांनी चित्रपटात स्टंट करण्याची संधी दिली. दिपकने आत्तापर्यंत मराठी, बॉलिवूड, टॉलीवूड, हॉलिवूड या सर्व चित्रपट दुनियेत आपल्या साहसी खेळाचा जलवा दाखवला आहे.

NSG कमांडोजना देतोय ट्रेनिंग -

दिपकला चित्रपट मिळू लागल्याने त्याची चर्चा अधिक होऊ लागली. दीपकबद्दल जेव्हा भारतीय सैन्याला माहिती मिळाली, त्यावेळी त्यांनी दिपकला NSG कमांडोजना साहसी प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित केले. दीपकने एन एस जी प्रशिक्षण केंद्रात जाऊन आपल्या कमांडोजना प्रशिक्षित केलं आहे.

मदतीची अपेक्षा -

आपली ही कला स्वतः पुरती मर्यादित न राहता ती इतरांपर्यंत देखील पोहोचली पाहिजे, म्हणून दीपकने अंधेरीत एक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्याबरोबर एक पुण्यात देखील सुरू केलं. या सर्वाचा खर्च अधिक असल्याने व या साहसी खेळाकडे तरुणांचा देखील कल कमी असल्याने दीपकची आर्थिक ओढाताण होते. त्यामुळे दिपकला सध्या आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

Last Updated : Mar 11, 2022, 8:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details