मुंबई :पीडित मॉडेलने दिलेल्या माहितीनुसार, ती 1 वर्षापूर्वी एका वाढदिवसाच्या पार्टीत आरोपी वीरेन पटेलला भेटली होती. तेथून त्यांच्यात मैत्री वाढू लागली. आरोपीने लग्न करण्याचे वचन देऊन पीडितेशी अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. तो दारू पिऊन तिला मारहाण करायचा, धमक्या द्यायचा. यामुळे हतबल झालेल्या पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी आरोपी वीरेन पटेल या मॉडेलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मॉडेलने पोलिसांना 2 व्हिडिओ देखील दिले आहेत. ज्या व्हिडीओत आरोपी व्यक्ती तिच्याबरोबर दिसत आहे. पीडित मॉडेलने पोलीस आणि सरकारकडे आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पीडितेच्या या आरोपावर पोलिसांचे अधिकृत वक्तव्य अद्याप आलेले नाही.
वीरेनची पीडितेला लग्नाची मागणी :पीडित मॉडेलच्या म्हणण्यानुसार, तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी वीरेन पटेल हा टांझानियामध्ये राहणारा 'एनआरआय' आहे. एका पार्टीदरम्यान तो तिला भेटला. त्यानंतर तो तिला नियमित मेजेस व कॉल करू लागला. त्यामुळे दोघांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण झाले. यानंतर एकमेकांना मदत करणे, भेटणे, व्यवसायाबाबत चर्चा करणे सुरू झाले. त्यामुळे मैत्री वाढत गेली. त्यानंतर आरोपी वीरेनने पीडितेला त्यांच्यासोबत फ्लॅटवर राहायला बोलवले. त्यामुळे 14 फेब्रुवारीला ती त्याच्या फ्लॅटवर राहावयास गेली. ते दोघेही सोबत राहत असताना वीरेन पटेल याने तिला लग्नाची मागणी घातली ज्याला तिने होकार दिला.
Model Rape Case Mumbai : महिला मॉडेलसोबत 'एनआरआय' मॉडेलचा लव-सेक्स-धोका; अत्याचाराचा अतिरेक अन् पोलिसात तक्रार - पीडितेशी अनेकवेळा शारीरिक संबंध
एका मॉडेलने टांझानियामध्ये राहणाऱ्या एका अनिवासी भारतीय व्यक्तीवर बलात्कार आणि प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वीरेन पटेल विरोधात पीडित मॉडेलने मुंबईतील एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम 376(2)(एन), 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीकडून पीडितेला मारहाण :यानंतर दोघांनीही त्यांच्या आई-वडिलांना ते लग्न करणार असल्याची माहिती दिली. त्यांनीही वीरेन आणि पीडितेच्या लग्नाला होकार दिला. लग्न करण्याचे निश्चित झाल्यामुळे पीडित मॉडेल आणि वीरेन पटेल यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. यानंतर वीरेन पीडित मॉडेलला दारू पिऊन मारहाण करायचा आणि धमक्यासुद्धा द्यायचा, असे पीडित मॉडेलने पोलीस जबाबात म्हटले आहे. अखेर हतबल झालेल्या पीडित मॉडेलने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. मुंबईत यापूर्वीही अनेक नवख्या मॉडेलला लग्नाचे किंवा सिनेमात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.
हेही वाचा: