मुंबई - आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांत उमेदवार निश्चित करण्यापासून ते पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. यातच शिवसेनेतही प्रचाराची रणनिती आखली जात आहे. शिवसेनेच्या या प्रचाराच्या रणधुमाळीसाठी मूळचा मुंबईचा असलेला मात्र ब्राझीलला स्थायिक झालेला मराठी शिवसैनिक धावून आला आहे. धीरज मोरे, असे या शिवसैनिकाचे नाव आहे.
'हा' शिवसैनिक दिसणार लोकसभेच्या रणधुमाळीत, परदेशात म्हणतात 'मुंबईचा वाघ' - dhiraj more
शिवसेनेने मुंबई व राज्यभरातून विभिन्न वयोगटातील २२ स्टार प्रचारक नेमले आहेत. शिवसेनेने नेमलेल्या स्टार प्रचारकाच्या यादीत धीरजचेही नाव आहे.

धीरज मोरे यंदा शिवसेनेसाठी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत. मागच्या २० वर्षापासून धीरज ब्राझील येथे स्थायिक झाला आहे. चीन व ब्राझील येथे त्याचा व्यवसाय आहे. मुंबईत कॉलेजमध्ये असताना एकदाच बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची भेट झाली होती. शिवसेनेने त्यांना ना नोकरी दिली ना पद दिलं फक्त भीड म्हणण्याची ताकद. या ताकदीच्या बळावरच ते परदेशातही मराठी बाणा जपत असल्याचे तो म्हणतो. परदेशात गाड्यांवर स्टिकर लावणं कायदेशीर गुन्हा असतानाही ते दंड भरून गाडीवर शिवसेनेच्या वाघाचं चित्र व शिवसेनेची गाणी वाजवत फिरतात. यामुळे त्यांना परदेशात मुंबईचा वाघ म्हणून ओळखले जाते.
शिवसेनेने मुंबई व राज्यभरातून विभिन्न वयोगटातील २२ स्टार प्रचारक नेमले आहेत. शिवसेनेने नेमलेल्या स्टार प्रचारकाच्या यादीत धीरजचेही नाव आहे.