महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Voter Id Card : आता घरबसल्या मतदार ओळखपत्र बनवू शकता, तेही घरपोच मिळेल - मतदार ओळखपत्र कसे मिळवायचे

जेव्हा तुम्ही कोणतेही सरकारी किंवा निमसरकारी काम करण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला अनेक कागदपत्रांची आवश्यकता ( How to get voter ID card ) असते. अशा परिस्थितीत लोकांना ही कागदपत्रे आधीच तयार ठेवावी लागतात.

Voter Id Card
Voter Id Card

By

Published : Oct 28, 2022, 12:14 PM IST

मुंबई :जेव्हा तुम्ही कोणतेही सरकारी किंवा निमसरकारी काम करण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला अनेक कागदपत्रांची आवश्यकता ( How to get voter ID card ) असते. अशा परिस्थितीत लोकांना ही कागदपत्रे आधीच तयार ठेवावी लागतात. आजकाल आधार कार्ड जवळपास प्रत्येक कामासाठी आवश्यक झाले आहे. अशा परिस्थितीत अनेकजण मतदार कार्ड ओळखपत्र म्हणून विसरले आहेत. त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.

मतदार ओळखपत्र कसे बनवायचे : मतदानाच्या वेळी वोटींग कार्डची गरज सगळ्यांनाच भासते. लोकसंख्येच्या मानाने मतदारांची संख्याही भारतात खूप जास्त आहे. ज्यांनी अद्याप आपले मतदार ओळखपत्र बनवलेले नाही. त्यांनी बातमी वाचून लवकर वोटींग कार्ड बनवून घ्या. सरकारी कार्यालयात जाणे टाळण्यासाठी बरेच लोक अर्ज देखील करत नाहीत. त्यामुळे आता ऑनलाइन वोटींग कार्ड बनवून मिळवू ( Online Voter ID Card ) शकते आणि ते तुमच्या पत्त्यावरही पोहोचत ( voting card will reach at home ) आहे. चला तर मग जाणून घेऊया घरबसल्या बनवलेले मतदार ओळखपत्र कसे मिळवायचे.

निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट :जर तुम्ही अद्याप तुमचे मतदार ओळखपत्र बनवले नसेल, तर ते बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://eci.gov.in/ वर जावे लागेल. येथे जाऊन मतदार सेवा पोर्टलच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पोर्टलवर एक नवीन खाते तयार करावे लागेल. ज्यासाठी तुमचा मोबाइल नंबर टाकणे गरजेचे आहे. त्यावर आलेला ओटीपी सबमिट करा. यानंतर, तुम्हाला तुमचा पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर तुमचे खाते तयार होईल.

नवीन मतदार नोंदणी :त्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. तुम्हाला 'नवीन मतदार नोंदणी' ( New Voter Registration ) या पर्यायावर क्लिक करावे लागेल. मग इथे तुमचे नाव, लिंग, घरातील कोणाचे तरी मतदार ओळखपत्र ऍड करावे लागेल. त्यानंतर त्याची सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अर्जदाराचा फोटो आणि वयाचा पुरावा आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी सबमिट करा. आता तुमच्या ईमेलवर आलेल्या ईमेलद्वारे तुमच्या स्टेटसचा मागोवा घेत राहा आणि एक आठवड्यापासून महिनाभरात तुमचे वोटींग कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहोचेल.

ABOUT THE AUTHOR

...view details