महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट; एमएमआरसीवर आली कंत्राटदाराला मजूर मिळवून देण्याची नामुष्की - Mmrc mumbai workers job add

33.5 कि.मीचा भुयारी मेट्रो-3 प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करायचा आहे. पण आता या प्रकल्पावर काम करणारे अनेक मजूर कोरोनाच्या भीतीने आपापल्या गावी परतले आहेत. आता हळूहळू मजूर पुन्हा मुंबईत येत आहेत. पण त्यांचे प्रमाण फारच कमी आहे. तेव्हा मजूर येईपर्यंत वाट पाहणे, काम थांबवून ठेवणे एमएमआरसीला शक्य नाही. त्यामुळे कंत्राटदारांनी मजुरांची सोय करत काम पुढे नेणे गरजेचे होते.

Mmrca mumbai 3
Mmrca mumbai 3

By

Published : Jun 20, 2020, 4:25 PM IST

मुंबई- कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका मुंबईतील महत्वाकांक्षी अशा कुलाबा-वांद्रे-सीपझ या भुयारी मेट्रो-3 प्रकल्पालाही बसला आहे. या प्रकल्पातील मोठ्या संख्येने मजूर निघून गेले आहेत. त्यामुळे काम संथ गतीने सुरू आहे. अशावेळी आता कंत्राटदाराला मजूर मिळवून देण्याची जबाबदारी मुंबई मेट्रोरेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ला घ्यावी लागली आहे. त्यामुळेच कधी नव्हे ते पहिल्यांदाच एखाद्या सरकारी यंत्रणेला कंत्राटदाराला मजूर मिळवून देण्यासाठी जाहिरात काढावी लागली आहे.

33.5 कि.मीचा भुयारी मेट्रो-3 प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करायचा आहे. पण आता या प्रकल्पावर काम करणारे अनेक मजूर कोरोनाच्या भीतीने आपापल्या गावी परतले आहेत. आता हळूहळू मजूर पुन्हा मुंबईत येत आहेत. पण त्यांचे प्रमाण फारच कमी आहे. तेव्हा मजूर येईपर्यंत वाट पाहणे, काम थांबवून ठेवणे एमएमआरसीला शक्य नाही. त्यामुळे कंत्राटदारांनी मजुरांची सोय करत काम पुढे नेणे गरजेचे होते. पण प्रत्यक्षात मात्र हे काम करण्याची नामुष्की एमएमआरसीवर आली आहे. त्यानुसार एमएमआरसीने नुकतीच 5 हजार 637 मजुरांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

या जाहिरातीनुसार कुशल-अकुशल कामगारांची भरती करण्यात येणार आहे. तर अकुशल कामगारांना एक महिन्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तसेच त्यांची राहण्याची आणि खाण्या-पिण्याची सोय कंत्राटदाराकडून केली जाणार आहे. या जाहिरातीनुसार इच्छुकांना थेट कंत्राटदाराशी संपर्क साधावा लागणार आहे. मजुरांना पुढे भुयारी मेट्रो मार्गाच्या बांधकामाची जबाबदारी असणार आहे.

गवंडी, फिटर, वेल्डर, सुतार, रिगर, क्रेन ऑपरेटर अशा मजुरांचा यात समावेश आहे. तेव्हा आता या जाहिरातीला कसा प्रतिसाद मिळतो आणि कंत्राटदारांची मजुरांच्या कमतरतेची डोकेदुखी थांबते का, हे लवकरच समजेल. दरम्यान, याविषयी एमएमआरसीशी संपर्क साधला, पण त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details