महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता प्राण्यांच्या डोळ्यांवर उपचारासाठी 'आय स्पेशालिस्ट' डॉक्टर.. प्राण्यांसाठीचे नेत्र चिकित्सालय सुरु - story of Mumbais first animal eye specialist

आपल्या देशातील प्राण्यांच्या डोळ्यांचा डॉक्टर बनण्याचा मान मिळवला आहे एका अस्सल मराठी तरुणीने! (animal eye specialist in maharashtra). त्यांचे नाव आहे डॉक्टर कस्तुरी भडसावळे. (kasturi bhadsavale). त्यांनी मुंबईतील चेंबूर आणि पुणे येथे प्राण्यांसाठी शहरातील पहिले नेत्र चिकित्सालय सुरू केले आहे. (Mumbais first animal eye specialist clinic).

प्राण्यांसाठी नेत्र चिकित्सालय
प्राण्यांसाठी नेत्र चिकित्सालय

By

Published : Oct 28, 2022, 6:00 PM IST

मुंबई: आजपर्यंत तुम्ही प्राण्यांचे अनेक डॉक्टर पाहिले असतील, मात्र आपल्या देशात प्राण्यांच्या डोळ्यांचा स्पेशालिस्ट डॉक्टरही आहेत! प्राण्यांच्या डोळ्यांचा डॉक्टर बनण्याचा मान हा मिळवला आहे एका अस्सल मराठी तरुणीने! (animal eye specialist in maharashtra). त्यांचे नाव आहे डॉक्टर कस्तुरी भडसावळे.(kasturi bhadsavale). त्यांनी मुंबईतील चेंबूर आणि पुणे येथे प्राण्यांसाठी शहरातील पहिले नेत्र चिकित्सालय सुरू केले आहे. (Mumbais first animal eye specialist clinic).

लहानपणीच ठरवलं प्राण्यांचे डॉक्टर व्हायचं:डॉक्टर कस्तुरी ह्या मूळच्या मुंबई शेजारील नेरळमधील सगुणा बाग इथल्या रहिवाशी. त्या वडिलांच्या शेतातच लहानाच्या मोठया झाल्या. लहानपणापासून घोडे, कुत्रे आणि मांजर, कोंबड्या, मोर आणि साप ह्यात त्यांचे बालपण गेले होते. त्यामुळे डॉक्टर कस्तुरी यांनी लहान असतानाच पशुवैद्य बनायचे ठरवले होते. त्या ज्या भागात राहत होत्या त्या कर्जत नेरळच्या भागात आजही मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. शेती असल्याने अनेकांकडे पाळीव प्राणी आहेत. मात्र इथे एखादा पाळीव प्राणी आजारी पडल्यास त्याला कोणतीही वैद्यकीय मदत उपलब्ध नाही, हे त्यांना दिसून आले. या परिस्थितीमुळेच त्यांनी भविष्यात प्राण्यांचे डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.

डॉक्टर कस्तुरी भडसावळे

देशभरातून बोलावतात लोक:मेडिकलचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. कस्तुरी भडसावळे यांनी नेत्रचिकित्सा विषयात स्पेशलायझेशन निवडले आणि पुढील शिक्षणासाठी त्या परदेशात गेल्या. ऑस्ट्रेलियात ७ वर्षाची प्रॅक्टिस केल्यानंतर त्या २०१९ मध्ये भारतात परतल्या. मुंबईतील चेंबूर भागात तसेच पुण्यात त्यांनी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्पेशल आय वेट (eye vet) नावाचे क्लिनिक सुरू केले. सध्या त्यांना फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशभरातून प्राण्यांचे मालक आपल्या पाळीव प्राण्यांची डोळ्यांची तपासणी करण्यासाठी बोलावत असतात.

गुरांच्या डॉक्टरांना समाजात प्रतिष्ठा नाही:आपल्या या प्रवासाबाबत बोलताना डॉक्टर कस्तुरी भडसावळे सांगतात की, माझे संपूर्ण बालपण सर्वांना परिचित असलेल्या सगुणा बागेत गेले. त्यावेळी मी ठरवले होते प्राण्यांचे डॉक्टर व्हायचे. जेव्हा माझा हा निर्णय झाला तेव्हा आमच्या गावातल्या लोकांनी मलाच नाही तर माझ्या घरच्यांना देखील नावं ठेवली. आपल्याकडे प्राण्यांचे डॉक्टर होणं म्हणजे कमी प्रतिष्ठेचं मानलं जातं. लोक मला म्हणायचे, काय ते गुरांचा डॉक्टर होतेस. पण मला प्राण्यांची आवड असल्याने माझा निर्णय पक्का होता. त्यामुळे मी जे ठरवलं होतं तेच मी केलं.

प्राण्यांच्या डोळ्यांचे स्पेशालिस्ट:पुढे बोलताना डॉक्टर कस्तुरी सांगतात की, मी जेव्हा माझ्या पुढच्या शिक्षणासाठी परदेशात गेले त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, आपल्या देशात प्राण्यांचे डॉक्टर बरेच आहेत. मात्र एखादा विषय घेऊन त्यात स्पेशालिटी असणारे फार कमी आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे आपण माणसांच्या आजार पाहिले तर हृदयरोग तज्ञ, इतर हजारांचे तज्ञ, सर्जन असे प्रकार आहेत. मात्र प्राण्यांच्या बाबतीत ते दिसत नाही. त्यामुळे मी प्राण्यांचे डोळे आणि त्यांच्या आजार यात स्पेशलायझेशन केलं. आपल्या देशात प्राण्यांची वैद्यकीय तपासणी करणारे अनेक दवाखाने आहेत मात्र खास प्राण्यांच्या डोळ्यांची तपासणी करणारा दवाखाना नाही. त्यामुळे मी हा दवाखाना मी सुरू केला.

ABOUT THE AUTHOR

...view details