मुंबई - एक काळ असा होता, जेव्हा प्रोफेशनल कॅमेरा काही लोकांनाच विकत घेता येत असे. त्यामुळे फोटोग्राफरला विशेष महत्व होते. मात्र आता काळ बदलला आहे. कॅमेऱ्याची किंमत कमी झाली आहे आणि मोबाईलमध्येही फोटो काढणे शक्य झाले आहे. त्यामुळे हौशी फोटोग्राफारची संख्या भरमसाठ वाढली आहे. गुढीपाडव्याला अशा हौशी फोटोग्राफरनी आपल्या फोटोग्राफीची हौस भागवून घेतली.
मै भी फोटोग्राफर... गुढीपाडव्याची मिरवणूक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हौशी फोटोग्राफर्सची झुंबड - picture.
सोशल मीडियामध्ये आपल्या फोटोला जास्तीत जास्त लाईकच मिळावे यासाठी तरुणाई प्रयत्नशील असते. भव्य मिरवणूक , नटलेली बच्चे कंपनी, रांगोळी आदी त्यांच्यासाठी खाद्य असते. एकीकडे मोबाईल सेल्फी कॅमेरा दुसरीकडे डिजिटल कॅमेरा यात तरुणाई व्यस्त होते. पण, यामुळे ते सणाचा आनंद लुटण्यापासून वंचित राहतात.
सोशल मीडियामध्ये आपल्या फोटोला जास्तीत जास्त लाईकच मिळावे यासाठी तरुणाई प्रयत्नशील असते. भव्य मिरवणूक , नटलेली बच्चे कंपनी, रांगोळी आदी त्यांच्यासाठी खाद्य असते. एकीकडे मोबाईल सेल्फी कॅमेरा दुसरीकडे डिजिटल कॅमेरा यात तरुणाई व्यस्त होते. पण, यामुळे ते सणाचा आनंद लुटण्यापासून वंचित राहतात. सण हा आनंद व्यक्त करण्यासाठी असतो परंतु युवापिढी ही कॅमेऱ्यात फोटो काढण्यात व्यस्त असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गिरगाव येथील मिरवणुकीत तर १०० हून जास्त हौशी फोटोग्राफर होते.
यावेळी काही हौशी फोटोग्राफर्सशी संवाद साधण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला. त्यातील प्रथमेश परदेशी म्हणाला, की मी पनवेलवरून खास गुढीपाडव्याचे पारंपरिक फोटो काढण्यासाठी गिरगाव येथे आलो. मी सलग तीन वर्षे इथे येत आहे. ते फोटो मी माझ्या कॅमेरात क्लीक करून सोशल मिडियाद्वारे सर्वापर्यत पोहचवणार आहे. वरळी येथून आलेला ओमकार सावंत म्हणाला, की फोटो काढणे हा माझा छंद आहे. सुरुवातीला मला फोटोग्राफी येत नव्हती तेव्हा मी सरावासाठी गिरगाव येथील शोभायात्रेत फोटो काढण्यासाठी येयाचो. आता मी दरवर्षी येतो.