महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Organ Donation to Poor People गरिबांना अवयवदानाचा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू - डॉ कृष्णन कुमार - संचालक डॉ कृष्णन कुमार

अवयवदानामुळे नागरिकाला जीवनदान ( Organ Donation to Poor People ) मिळते. मात्र अवयव दानाचा खर्च गरीबांना परवडत नाही. गरीबाना अवयव दाता उपलब्ध झाला, तरी कधी कधी वाहतुकीचा खर्च जास्त असतो. त्यामुळे अवयव प्रत्यारोपण ( NOTTO Follow up On Government )करण्यासाठी मदत देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्याचा पाठपुरावा घेण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय अवयव आणि उत्ती प्रत्यारोपण ( National Organ and Tissue Transplantation Organization ) समितीचे (नोटो) संचालक डॉ. कृष्णन कुमार यांनी दिली.

Organ Donation to Poor People
केईएम रुग्णालयात उत्तीपेशी पेढीचे उद्घाटन

By

Published : Jan 6, 2023, 4:22 PM IST

मुंबई- अवयवदान ज्याला आवश्यक आहे, त्याच्याकडून वाहतुकीचा खर्च घेतला जातो. हा खर्च गरिबांना परवडत नसल्याने अवयवदान प्रत्यारोपण ( Organ Donation to Poor People ) करून घेणे गरिबांना परवडत नाही. यासाठी वाहतुकीसाठी लागणारा खर्च व औषधाचा खर्च कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत ( NOTTO Follow up On Government ) चर्चा सुरू आहे. ज्या रुग्णांची त्वचा भाजली असेल किंवा काही कारणास्तव खराब झाली असेल, अशा रुग्णांना दिलासा मिळणार असल्याची माहिती राष्ट्रीय अवयव आणि उत्ती प्रत्यारोपण समितीचे (नोटो) संचालक डॉ कृष्णन कुमार ( National Organ and Tissue Transplantation Organization ) यांनी दिली. केईएम रुग्णालयात टिश्यू बँकेचे डॉ कृष्णन कुमार यांच्या हस्ते उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते.

गरिबांचा खर्च कमी होणारमहापालिकेच्या केईएम रुग्णालयात ( KEM Hospital Mumbai ) उत्तीपेशी पेढीचे (टिश्यू बँक) उद्घाटन डॉ कृष्णन कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ज्या रुग्णांची त्वचा भाजली असेल किंवा काही कारणास्तव खराब झाली असेल अशा रुग्णांना दिलासा मिळणार आहे. अवयवदानाची गरज सर्वांना असते. अवयवदान प्रत्यारोपण ( Reduce Cost Of Organ Donation to Poor ) करून घेणाऱ्या रुग्णाला अवयवाच्या वाहतुकीचा संपूर्ण खर्च करावा लागतो. हा खर्च श्रीमंत रुग्णांना परवडतो. मात्र गरिबांना परवडत नाही. त्यामुळे गरीब रुग्णांसाठी अवयव प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नोटोकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर अवयव प्रत्यारोपण होणाऱ्या रुग्णांचे पुनर्वसन करणे आणि त्यासाठी येणाऱ्या औषधांवरील खर्च कमी व्हावा यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे. रुग्णांना औषधांसाठी दरमहा किमान १० हजार रुपये मिळावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. कृष्णन ( NOTTO Director Krishan Kumar ) यांनी सांगितले.

अवयवदान करणाऱ्या व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण - मेंदूमृत व्यक्तीचे अवयव दान ( Brain Dead Patient Organ Donation) केले जातात. जीवंत दात्यापेक्षा मृत्यूपश्चात होणाऱ्या अवयवदानावर अधिक भर देणे गरजेचे आहे. यासाठी मृत्यूपश्चात अवयवदान करणाऱ्या व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत. राज्यांनी जेथे शक्य असेल तेथे वृक्षारोपण करावे अशा सूचनाही दिल्या आहेत. नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी धार्मिक नेत्यांची मदत घेण्याबाबत आम्ही विचार करत असल्याचेही नोटोचे संचालक कृष्णन कुमार यांनी सांगितले.

अवयवदान जनजागृतीसाठी उपाययोजना

मृत्यूपश्चात अवयवदान करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने वृक्ष लागवड करण्याचे राज्यांना निर्देश

धार्मिक नेत्यांच्या माध्यमातून जनजागृती करणे

अवयव दान केंद्रांची संख्या वाढविणे

कोमा आणि मेंदूमृत व्यक्ती यामधील नागरिकांमधील गैरसमज दूर करणे

मेंदमृत होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानासाठी तयार करणे

केईएम रुग्णालयामध्ये तीन सल्लागारांची नियुक्ती

ABOUT THE AUTHOR

...view details