महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mangal Prabhat Lodha : बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे मंत्री मंगल प्रभात लोढा यांना नोटीस - मंगल प्रभात लोढा यांना नोटीस

बांधकाम क्षेत्रातील रियल्टर्स कंपनीने मंत्री मंगल प्रभात लोढा आणि त्यांच्या दोन मुलांना बदनामीकारक वक्तव्य केल्यावरून कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी सात दिवसाच्या आत उत्तर दाखल करावे, अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीशीत म्हटले आहे.

Mangal Prabhat Lodha
मंगल प्रभात लोढा

By

Published : May 15, 2023, 4:10 PM IST

मुंबई : महाराष्ट्र सरकारमधील मंत्री मंगल प्रभात लोढा आणि त्यांच्या दोन्ही मुलांना रियल्टर्स कंपनीने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. याचिकाकर्त्याला हप्ताखोर असे म्हटल्यामुळे बदनामी झाली, अशा स्वरूपाची नोटीस मंत्री मंगल प्रभात लोढा यांना रिअल्टर्स कंपनीच्या वकिलांमार्फत पाठवण्यात आली आहे.

याचिकाकर्त्याला 'हप्ताखोर' म्हटले होते : मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात 2013 मध्ये न्यायदंडाधिकारीकडे याचिका दाखल करून त्यानंतर न्यायदंडाअधिकाऱ्याने एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासंदर्भात प्रक्रिया केली होती. त्याला उत्तर म्हणून मंगल प्रभात लोढा यांनी याचिकाकर्त्याला 'हप्ताखोर' असे म्हटले होते. आता हे बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे रिअल्टर्स कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर यांनी मंगल प्रभात लोढा आणि त्यांच्या दोन्ही मुलांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

सात दिवसाच्या आत उत्तर दाखल करण्यास सांगितले : रियल्टस कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांना 1000 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच आमच्या बद्दल बदनामीकारक वक्तव्य केले म्हणून त्या प्रकरणी सात दिवसाच्या आत उत्तर दाखल करावे, अन्यथा आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू असे देखील त्यांनी कायदेशीर नोटीस मध्ये म्हटले आहे.

मंगल प्रभात लोढा यांच्या मुलांना प्रतिवादी केले आहे : रियल्टस कंपनीच्या वतीने या संदर्भात मंगल प्रभात लोढा यांना ईमेल, व्हाट्सअप आणि अधिकृत पत्त्यावर ही कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे. रियल्टस कंपनीचे वकील आनंद जोंधळे यांच्यामार्फत ही कायदेशीर नोटीस बजावलेली आहे. न्यायालयीन खटला सुरू असताना अशा पद्धतीने बदनामीकारक व्यक्तव्य करणे म्हणजे मानहानी आहे, अशा अर्थाने ही नोटीस बजावलेली आहे. तसेच मंगल प्रभात लोढा यांचा मुलगा अभिनंदन आणि अभिषेक यांना देखील यामध्ये प्रतिवादी करण्यात आले आहे. आता या संदर्भात मंगल प्रभात लोढा यांच्याकडून कोणते कायदेशीर पाऊल उचलले जाते याकडे लक्ष आहे.

हेही वाचा :

  1. Aryan Khan Drug Case : समीर वानखेडेने शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितली होती, सीबीआयच्या आरोपपत्रात खुलासा
  2. ED Summons Jayant Patil: ईडीने बजावले जयंत पाटील यांना दुसरे समन्स; 29 मे रोजी होणार चौकशी
  3. Action Against Tihar Jailer : सत्येंद्र जैनला कारागृहात सवलत, दोन कैद्यांनाही सेलमध्ये हलवले: तिहारच्या जेलरवर कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details