मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरही दावा केला जात असतांना शरद पवारांनी वेगळी खेळी करत अजित पवार गटाला गोंधळून टाकले आहे. शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या 24 आमदारांना पात्रतेसंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीस पाठवलेल्या अजित पवार गटाच्या आमदारांना विषयी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
पुनर्विचार नाही :आमच्या पक्षानं धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अपात्रतेबाबत आमदारांना नोटीस बजावली आहे. त्यातील काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं या आमदारांबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आत्ताच आम्ही नोटीसबाबत विचार केलेला आहे. त्यामुळं पुनर्विचाराचा प्रश्न येणे हा सर्वात मोठा विनोद आहे. आम्ही विचार करूनच अपात्रतेची नोटीस दिलेली आहे. त्यामुळं पुनर्विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
सरकारी कंत्राटी भरतीचा निषेध :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीनं भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानं सरकारविरोधात नाराजी आहे. यावर शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केलीय. तसंच त्यांनी राज्य सरकरानं घेतलेल्या निर्णयाचा निषेध केलाय.