मुंबई Redbird Flight Training Academy :उड्डाण प्रशिक्षण संस्था रेडबर्ड यांच्याकडून यापूर्वी देखील अशा पद्धतीची कृती झाली होती. याच अपराधाची त्यांनी पुनरावृत्ती केल्यानं अजून एका विमानाचा अपघात झाला. विमान क्रॅश झालं तेव्हा ही बाब लक्षात आली की संस्थेनं त्यावेळेला फक्त सिक्युर डिजिटल एसडी कार्ड काढून टाकलं होतं. इतकच नाही तर नंतर त्यांच्याशी छेडछाड करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी माहिती विमान अपघात तपास संस्थेनं दिली आहे.
रेडबर्ड विमान उड्डाण संस्थेची कृती नियमांचं उल्लंघन करणारी :यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत विमान अपघात तपास संस्थेनं म्हंटलंय की, याबाबत आम्ही अलीकडंच दोन लेख प्रकाशित केले होते. या विमान उड्डाण प्रशिक्षण संस्थेनं दोन अपघातग्रस्त विमानांच्या डेटा कार्डमध्ये छेडछाड केल्याचं समोर आलं होतं. तसंच या संस्थेनं केवळ डिजिटल डेटा कार्ड काढलं असं नाही, तर ते विमान अपघात तपास संस्थेकडं देण्यापूर्वी त्याच्याशी छेडछाडही करण्यात आली, असं एआयबीच्या प्राथमिक अहवालामधून दिसून आलं. तसंच ही कृती नियमांचं उल्लंघन करणारी असल्याचंही विमान अपघात तपास संस्थेनं म्हंटलंय.
...त्यामुळं बजावली नोटीस :विमान अपघात तपास संस्थेनं हे देखील नमूद केलंय की, अगोदर देखील रेडबर्ड उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमानाचा अपघात झाला. तेव्हा ब्लॅक बॉक्स म्हणून काम करणाऱ्या एसडी कार्ड सोबत छेडछाड केल्यामुळं विमान उड्डाणा संदर्भातील महत्त्वाचा रेकॉर्ड गेला. तसंच दुसऱ्यांदा जेव्हा अपघात झाला. तेव्हा एआयबीकडं तो डेटा सोपवण्याआधी त्याच्याशी छेडछाड केली गेली. म्हणूनच डीजीसीएनं रेड बर्ड संस्थेला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे.