मुंबई: नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (शुक्रवारी) मुंबईच्या अंधेरी भागात होते. यावेळी त्यांनी अंधेरी येथे पालिकेच्या विविध कामांची पाहणी केली. त्यातच आता पावसाळा तोंडावर असल्याने पालिकेने नालेसफाईच्या कामाला प्राधान्य दिले जात आहे. मुंबईतील नालेसफाईचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी: झालं असं की, अंधेरी येथील गोखले पुलाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. त्यासोबतच या पुलाखाली मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा देखील त्यांनी यावेळी आढावा घेतला. मुंबई महानगरपालिकेचे पर्जन्य आणि जलवाहिन्या विभागाचे मुख्य अभियंता विभास आचरेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. सांताक्रूझ येथील मिलन सबवे येथे नालेसफाईची पाहणी करताना नाला अस्वच्छ असल्याने ही नोटीस बजावण्यात आलेली आहे.
त्यासाठी रेल्वे महाप्रबंधकांशी बोलणार:अंधेरी येथे विविध कामांची पाहणी करत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, गोखले पुलाचे काम येत्या दिवाळीपर्यंत जलदगतीने पूर्ण करावे, असे निर्देश मुंबई महानगरपालिकेला दिले. तसेच हा पूल सुरू होईपर्यंत बाजूचा रेल्वेचा पूल पादचाऱ्यांना वापरण्यासाठी परवानगी द्यावी. यासाठी स्वतः पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक यांच्याशी बोलणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
'बीएमसी'वर सत्ता गाजविण्याचे भाजपचे स्वप्न:आशियातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका अशी बृहन्मुंबई महानगरपालिकेची ओळख असल्याने या पालिकेवर आपली सत्ता असावी यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नात असतात. यावेळी देखील ही निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला भाजपचे मोठमोठे नेते सतत मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यात अमित शहा, जे. पी. नड्डा यांचे दौरे सतत होत आहेत.
हेही वाचा:
- Minor Girls Obscene Photo: जुगारात मोबाईल हरला अन 'त्याचे' घृणास्पद कृत्य आले समोर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Devendra Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत प्रशासन पोहोचवण्याचा प्रयत्न करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Ambadas Danve on Riots : 'जातीय तणाव असताना पोलीस शेपूट घालून बसले'