मुंबई-एकीकडे कोट्यवधी लोकांनी मतदान करून मतदानाचा हक्क बाजवला असला तरी महाराष्ट्रात लाखो लोकांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनाच नाकारले असल्याचे चित्र समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीत तब्बल ४ लाख ६ हजार ४९१ मतदारांनी कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला पसंती दिली नाही.
महाराष्ट्रातल्या लाखो मतदारांनी उमेदवारच नाकारले, नोटाला मिळाली चार लाखांवर मते - election
मतदारांना आपला हक्क अबाधित राखून उमेदवार नाकारण्याचा हक्क नोटाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. एकीकडे कोट्यवधी लोकांनी मतदान करून मतदानाचा हक्क बाजवला असला तरी महाराष्ट्रात लाखो लोकांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनाच नाकारले असल्याचे चित्र समोर आले आहे
मतदारांना आपला हक्क अबाधित राखून उमेदवार नाकारण्याचा हक्क नोटाच्या माध्यमातून देण्यात आला आहे . महाराष्ट्र पुरोगामी राज्य तसेच शिक्षित राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रातील मतदार उदासीन असल्याचेही दिसून आले आहे. महाराष्ट्रात एकूण ६०.६८ टक्के मतदान झाले . सर्वाधिक मतदान नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोलीत ७३ टक्के सर्वाधिक मतदान झाले. त्या गडचिरोलीत तब्बल २४ हजार ५९९ नोटा मतदान झाले आहे. तर सर्वाधिक नोटा मतदान पालघर जिल्ह्यात झाले आहे. पालघरमध्ये २९ हजार ४७९ मतदारांनी नोटाला पसंती दिली .
दहा हजारांवर नोटाला मतदान झालेले मतदार संघ
मतदार संघ | नोटा मतदान |
चंद्रपूर | ११३७७ |
कल्याण | १३०१२ |
मावळ | १५७७९ |
भंडारा | १०५२४ |
भिवंडी | १६३९९ |
जळगाव | १०३३२ |
नंदुरबार | २१९२५ |
उस्मानाबाद | १००२४ |
पुणे | ११००१ |
रायगड | ११४९० |
रामटेक | ११९२० |
रत्नागिरी | १३७७७ |
ठाणे | २०४२६ |