महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shah Rukh Khan : शाहरुखला नाही तर त्याचा बॉडीगार्डला कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर रोखले! - Shah Rukh Khan Upcoming Movies

शाहरुख खान शुक्रवारी रात्री दुबईहून आपल्या टीमसोबत मुंबईला परतला.विमानतळावर त्याला नव्हे तर त्याच्या अंगरक्षकाला कस्टम अधिकाऱ्यांनी अडवले ( srk bodyguard ravi singh detained by customs ) होते. हे समोर आले आहे. शुक्रवारी ही घटना घडली. शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी दुबईहून आल्यानंतर आधीच विमानतळावरून निघून गेले होते.

Shah Rukh Khan
शाहरुख

By

Published : Nov 13, 2022, 1:18 PM IST

Updated : Nov 13, 2022, 1:25 PM IST

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला कस्टम अधिकाऱ्यांनी रोखले ( Bollywood superstar Shah Rukh Khan ) नाही. तर त्याच्या अंगरक्षकाला अडवण्यात आले ( srk bodyguard ravi singh detained by customs) होते. एअर इंटेलिजन्स युनिटने मुंबई विमानतळावर थांबवले ( SRK stopped at Mumbai airport ) होते. मुंबई कस्टम्सच्या म्हणण्यानुसार, कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी खानचा अंगरक्षक रवी सिंग याला कस्टम नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल थांबवले. शाहरुख खानला थांबवले नाही.

दुबईहून टीमसह मुंबईत परतला :किंग खान शुक्रवारी रात्री दुबईहून आपल्या टीमसह मुंबईत परतला. खानच्या अंगरक्षकाने कस्टम ड्युटी भरली नव्हती मात्र कस्टम ड्युटी भरल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी दुबईहून आल्यानंतर आधीच विमानतळावरून निघून गेले होते. त्यांना कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले नव्हते.

अंगरक्षकाला अडवले :बॉडीगार्ड रवी सामान घेऊन घरी येत होता, त्यानंतर त्याला गेट क्रमांक 8 वर तपासणीसाठी थांबवण्यात आले. चेकिंगच्या वेळी सामान तपासणी केंद्रावर अंगरक्षकाकडे दोन आलिशान घड्याळ आढळले. त्याच्या सामानात iWatch Series 8 चा रिकामा बॉक्स देखील होता. एआययूने सर्व बॉक्सवर शुल्क भरले आणि कस्टमने शाहरुख खानला फक्त ड्युटी भरण्यास सांगितले, त्याने होकार दिला आणि पूर्ण शुल्क ( SRK fined by Customs Department ) भरले. त्याला 6.83 लाख रुपये कस्टम ड्युटी भरावी लागली. सीमा शुल्क भरल्यानंतर त्या सर्वांना जाण्याची परवानगी देण्यात आली, असे कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले.

आगामी चित्रपट : शाहरुख खान पुढे सिद्धार्थ आनंद-दिग्दर्शित अ‍ॅक्शनर पठाणमध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या सह-कलाकारांमध्ये दिसणार ( Shah Rukh Khan Upcoming Movies ) आहे. शाहरुखच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांनी चांगलाच पसंत केला आहे. तमिळ दिग्दर्शक अ‍ॅटलीसोबत या अभिनेत्याचा सिनेमा होतो आहे. या अ‍ॅक्शन ड्रामामध्ये तमिळ सुपरस्टार विजय सेतुपती आणि नयनतारा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यानंतर तो राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू देखील मुख्य भूमिकेत आहे.

Last Updated : Nov 13, 2022, 1:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details