मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ( Sushant Singh Rajput ) मृत्यूला दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. 14 जून 2020 रोजी, त्याने त्याच्या मुंबईतील पश्चिम उपनगरातील वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. यानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली. ज्या फ्लॅटमध्ये तो मृतावस्थेत आढळला त्या फ्लॅटला भाडेकरू मिळत नसल्याची माहिती आता समोर आली आहे. हा फ्लॅट गेल्या अडीच वर्षांपासून रिकामाच असून त्यात कोणीही राहण्यास तयार नाही. आता या फ्लॅटच्या ब्रोकरने एक व्हिडिओ ट्विट केला आहे आणि सांगितले आहे की, ते दरमहा 5 लाख रुपये भाड्याने उपलब्ध आहे. रफिक मर्चंट असे या ब्रोकरचे नाव आहे. या फ्लॅटचा मालक एनआरआय आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत कॉर्पोरेट व्यक्तीच्या शोधात :फ्लॅट मालक कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला भाड्याने देऊ इच्छित नाही. तो भाडेकरू म्हणून कॉर्पोरेट व्यक्ती शोधत आहे. ब्रोकरने सुशांत सिंह राजपूतच्या रिकाम्या घराचा संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे आणि तो ट्विट केला आहे. त्याचा फोन नंबरही दिला आहे. हे समुद्रासमोर असलेले डुप्लेक्स 4BHK फ्लॅटआहे. या फ्लॅटचे महिना भाडे 5 लाख रुपये आहे.
कसा आहे फ्लॅट ? : जॉगर्स पार्क, वांद्रे माँ ब्ला इमारतीमध्ये सर्वात शेवटच्या मजल्यावर हा डुप्लेक्स आहे. या फ्लॅटमधून समुद्राचा पूर्ण नजर दिसतो. चार बेडरूम, एक हॉल आणि किचन असा प्रशस्त फ्लॅट आहे. त्याला पुढे मोठी गच्ची देखील आहे. त्यापैकी वरच्या मजल्यावरील बेडरूम सुशांतची आवडीची होती. तो तिथे तासन्तास असायचा.
सुशांत सिंहच्या घराला भाडेकरू मिळेना : सुशांत सिंह राजपूत या घरात मृतावस्थेत आढळला होता. तो गेल्यापासून हे घर असेच रिकामे पडले आहे. तिथे राहायला कुणीही तयार नाही. असे असले तरी भाडे लाखोंच्या घरात आहे की सामान्य माणूस तिथे भाड्याने राहण्याचा विचार करू शकत नाही. रफिक मर्चंटने या घराला नवीन भाडेकरू का मिळत नाहीत हे सांगितले.
सुशांतच्या घरात कुणाला का राहायचे नाही ? : रफिक मर्चंट सांगतात की, 'लोक या फ्लॅटमध्ये राहायला घाबरतात. ज्या फ्लॅटमध्ये अभिनेत्याचा मृत्यू झाला तोच फ्लॅट असल्याचे भाडेकरूला कळल्यावर ते इथे राहायला नकार देतात. आजकाल अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी जुनी झाल्याने लोक निदान फ्लॅट बघायला येत आहेत. मात्र, भाडे करार अंतिम होत नाही. या घराच्या मालकालाही त्याचे भाडे कमी करायचे नाही. त्यामुळे लोक त्याच परिसरात इतर फ्लॅट खरेदी करण्यास प्राधान्य देतात.