मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या एक मिम शेअर करून वादात अडकला आहे. विवेक ओबेरॉयने स्वत: हा वाद ओढवून घेतला आहे. एका वादग्रस्त ट्विटमुळे हा वाद निर्माण झाला आहे. या ट्विटमध्ये सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचा फोटो वापरण्यात आला असून एक्झिट पोलवर भाष्य करण्यात आलं आहे. हा प्रकार महिला व मुलींच्या बाबतीत ट्विट केल्यामुळे महिला वर्गात आक्रोश निर्माण झाला होता. त्यामुळे आज ईशान्य मुंबई जिल्हा महिला कमिटी तर्फे घाटकोपर येथील पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
विवेक ओबेरॉय यांनी माफी जरी मागितली तरी हा अपमान महिला आणि मुलींचा आहे. त्यामुळे मुंबईतील महिला काँग्रेस कमिटीने मुंबईतील जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या वेळी विवेक ओबेराय याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. असे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्षा मनीषा सूर्यवंशी म्हणाल्या.