महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रिया दत्त यांची संपत्ती 'इतक्या' कोटींनी वाढली

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांची मागील पाच वर्षांत ६ कोटी ९४ लाख रुपयांनी संपत्ती वाढली आहे. यात त्यांनी विविध बँकेतील बचत, शेअरमधील गुंतवणूक, शेतजमिनी आदींतून आपल्या संपत्तीत वाढ झाली असल्याचे नमूद केले आहे.

प्रिया दत्त

By

Published : Apr 9, 2019, 8:25 AM IST

मुंबई - उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांची मागील पाच वर्षांत ६ कोटी ९४ लाख रुपयांनी संपत्ती वाढली आहे. यात त्यांनी विविध बँकेतील बचत, शेअरमधील गुंतवणूक, शेतजमिनी आदींतून आपल्या संपत्तीत वाढ झाली असल्याचे नमूद केले आहे.

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांची संपत्ती ही मागील पाच वर्षांत १०८ कोटींहून घटून २ कोटी २१ लाखांवर आली असतानाच प्रिया दत्त यांची मात्र ७ कोटींच्या दरम्यान वाढली आहे.

सोमवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात ही माहिती दिली आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी आपली एकूण संपत्ती ही ६५ कोटी ५० लाख रुपये इतकी दाखवली होती. यात ६ कोटी ९४ लाख रुपयांची भर पडली आहे. त्यात प्रिया दत्त यांची स्वत:ची संपत्ती ही १७ कोटी ८४ लाख आणि पती ओवेन रॉनकॉन यांची ५ कोटी ८५ लाख अशी २३ कोटी ६९ लाख इतकी दाखवली आहे. तर सिद्धार्थ आणि सुमेर या दोन मुलांच्या नावांवर ४८ कोटी ७५ लाख रुपयांची संपत्ती अशी एकूण ७२ कोटी ४४ लाखांची संपत्ती प्रिया दत्त यांनी आपल्या शपथपत्रात दाखवली आहे.

विशेष म्हणजे २००९ मध्ये प्रिया दत्त यांनी दिलेल्या शपथपत्रात ३७ कोटी २ लाख इतकी संपत्ती दाखवली होती. त्यांनतर त्या खासदार झाल्या आणि त्यांच्या संपत्तीत ३७ कोटींची भर पडली. यामुळे २०१४ मध्ये त्यांची संपत्ती ही ६५ कोटी ५० इतकी झाली होती. आता त्यात ६ कोटी ९४ लाखांची भर पडली आहे.

प्रिया दत्त यांनी आपल्याजवळ रोख रक्कम ही १३ लाख तर पतींकडे १० लाख आणि त्याहून अधिक असल्याचे सांगितले आहे. तर आपल्याकडे ३२ लाख ९७ हजार रुपयांची दागिने, हिरे आदी मौल्यवान वस्तू आहेत तर पतीकडेही ५ लाख २४ हजारांच्या अशा वस्तू असल्याचे म्हटले आहे. मात्र, मुलांच्या नावावर कोणत्याही प्रकारचे दागिने नसल्याचे नमूद केले आहे.

अशी होती प्रिया दत्त यांची संपत्ती...

वर्षे एकूण संपत्ती

२००९ ३७ कोटी २ लाख
२०१४ ६५ कोटी ५० लाख
२०१९ ७२ कोटी ४४ लाख

ABOUT THE AUTHOR

...view details