मुंबई - लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्याचे मतदान आज झाले. यावेळी अनेक अनिवासी भारतीय परदेशातून आपल्या देशात मतदान करण्यासाठी आले होते. मुंबईतील मतदान केंद्रावरही असे अनेक अनिवासी भारतीय मतदानाच्या रांगेत उभे राहून मतदान करत होते. त्यांनी आज मतदान करुन त्यांना मतदानाविषयी काय वाटते, याविषयी भावना व्यक्त केल्या.
अनिवासी भारतीय मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, व्यक्त केल्या 'या' भावना - अनिवासी भारतीय
ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने अनिवासी भारतीयांशी संवाद साधून त्यांचे मतदानाविषयी काय विचार आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
अनिवासी भारतीय मतदार
आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी मुंबईतील विविध मतदान केंद्राचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अनिवासी भारतीयांशी संवाद साधून त्यांचे मतदानाविषयी काय विचार आहेत, हे जाणून घेतला.