मुंबई -रवी-नवनीत राणा यांनी त्यांच्या वक्तव्याने जामीन अटीचे उल्लंघन केले ( Rana Couple Violated Conditions ) आहे. या जोडप्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, असा अर्जमुंबई पोलिसांनी न्यायालयात दाखल केला ( Mumbai Police has filed an application ) आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना नोटीस बजावली असून त्यांनी जामीनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये, याविषयी त्यांचे म्हणणे मागितले आहे.
न्यायालयाची विचारणा - आज मुंबई सत्र न्यायालयाने राणा दांपत्याविरोधात नोटीस काढली असून जमीन का रद्द करण्यात येऊ नये यासंदर्भात विचारले आहे 18 मे पर्यंत राणा दाम्पत्यांना नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्य यांचे जामीन रद्द होते, काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यावर उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेत. राणा दाम्पत्याने मीडियाशी बोलू नये याच अटीशर्तीवर राणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तरीही नवनीत राणा यांनी रुग्णालयातून बाहेर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. त्यानंतर जामीन रद्द करण्याचा अर्ज सरकारतर्फे कोर्टात दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांना आव्हान - राणांनी रुग्णालयातून बाहेर येताच मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले. मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावे आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवे, उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात उभे राहतील, तेथे मी उभी राहून जिंकून दाखवते असेही नवनीत राणा यांनी म्हटले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्यावरून राणा दाम्पत्य मुंबईत पोहोचले होते. पण शिसैनिकांनी त्यांना त्यांच्या खार येथील घरीच रोखून धरले. त्यानंतर राणा दाम्पत्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अखेर 12 दिवसानंतर राणा दाम्पत्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यांना याप्रकरणी माध्यमांसोबत बोलण्यास बंदी घालण्यात आली होती. नाहीतर त्यांचा जामीन रद्द केला जाईल असे न्यायालयाने म्हटले होते. पण नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पुन्हा तसेच वक्तव्य केले. माध्यमांसोबत बोलून जामीनाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द झाला असून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करा असा युक्तीवाद सरकारी वकील घरत यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्यांना नोटीस पाठवली आहे. आता राणा दाम्पत्यांना अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
न्यायालयाच्या शर्तीचे उलंघन - जामीनावर सुटका झालेल्या नवनीत यांना मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चॅलेंज दिले. त्यामुळे त्यांनी जामीन देता वेळी न्यायालयाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केलं आहे. त्यामुळे न्यायालयाने राणा पती पत्नीच्या नावे अजामीनपात्र वॉरंट काढावे अशी मागणी केले असल्याचे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे.
14 वर्ष तुरुंगात रहायला तयार -नवनीत राणा यांनी म्हणले आहे की, मी अशी काय चूक केली होती, हनुमान चालीसा वाचणे आणि श्रीरामाचे नाव घेणे यासाठी मला 14 दिवसासाठी जेलमध्ये ठेवले, हा जर गुन्हा असेल तर मी चौदा दिवस नाही 14 वर्ष तुरुंगात रहायला तयार आहे. एखाद्या महिलेला राज्यसरकार दाबू शकत नाही, ही लढाई मी पुढेही सुरुच ठेवेल, माझ्यावर क्रूर बुद्धीने कारवाई करण्यात आली. मला अजूनही त्रास होतोय मात्र डॉक्टरांना विनंती करून मी डिस्चार्ज घेतला आहे.