महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Navneet Rana Fake Caste Certificate जात पडताळणी प्रकरणात खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी कायम - Fake Caste Certificate

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana caste verification case ) यांच्या जातीच्या प्रमाणपत्राचा वाद न्यायालयात सुरू आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नवनीत राणा ( Non Bailable Warrant Against MP Navneet Rana ) आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. मात्र शिवडी न्यायालयाने खासदार नवनीत राणा ( Navneet Rana caste verification case ) यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने नवनीत राणा यांच्याविरोधातील वॉरंट जैसे थे ठेवले आहेत. त्यामुळे नवनीत राणा यांच्यापुढील अडचणी कायम आहेत.

MP Navneet Rana
खासदार नवनीत राणा

By

Published : Dec 29, 2022, 4:06 PM IST

मुंबई - बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana caste verification case ) यांच्यापुढील अडचणी कायम आहेत. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ( Shivdi Metropolitan Magistrate Court ) नवनीत राणा व त्यांच्या वडिलांविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट ( Non Bailable Warrant Against MP Navneet Rana ) जैसे थे ठेवले आहे. यावेळी नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर निर्णय येईपर्यंत कारवाईला स्थगिती देण्याची विनंती करत अर्ज केला. या अर्जावर सरकारी वकिलांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने ( Navneet Rana caste verification case ) दिले आहेत. पुढील सुनावणी 5 जानेवारी रोजी होणार आहे.

नवनीत राणा यांना तातडीने दिलासा देण्यास नकारखासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana caste verification case ) यांना तातडीने दिलासा देण्यास नकार देत न्यायालयाने सरकारी पक्षाला बाजू मांडण्याचे निर्देश दिले. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी नवनीत राणा ( Non Bailable Warrant Against MP Navneet Rana ) व त्यांचे वडील हरभजन सिंग यांच्याविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून शिवडी न्यायालयाने दोघांविरुद्ध चारवेळा अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.

वॉरंटची अंमलबजावणी करण्यास पोलिसांची असमर्थतानवनीत राणा सध्या संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. मात्र त्यांचे वडील हरभजन कुंडलेस यांना वॉरंट ( Non Bailable Warrant Against MP Navneet Rana ) बजावण्यासाठी त्यांच्या पत्त्यावर गेलो होतो. मात्र ते त्या घरामध्ये सापडले नाहीत, असे सांगून मुलुंड पोलिसांनी नवनीत राणा ( MP Navneet Rana caste verification case ) व त्यांच्या वडिलांविरुद्धच्या वॉरंटची अंमलबजावणी करण्यास पुन्हा असमर्थता दर्शवली. त्यावर दंडाधिकाऱ्यांनी पुन्हा नाराजीचा सूर आळवला.

शाळा सोडल्याचा खोटा दाखलाखासदार नवनीत राणा यांच्या विरोधात कलम 420, 468, 471 आणि 34 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवनीत राणा आणि हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस हे देखील या प्रकरणात आरोपी आहे. नवनीत राणा ( Non Bailable Warrant Against MP Navneet Rana ) यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा खोटा दाखला केल्याचा आरोप आहे. अमरावती मतदार संघ अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात राणा उर्फ ​​नवनीत कौर हरभजन सिंग कुंडलेस ( MP Navneet Rana caste verification case ) आणि तिचे वडील हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाचा निष्कर्ष2021 मध्ये राणाला मुंबई उच्च न्यायालयाने तिचे प्रमाणपत्र फसव्या पद्धतीने मिळविल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर ते सरेंडर करण्याचे आदेश दिले होते. अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव असलेल्या जागेवर खासदारपदाची निवडणूक लढवता यावी म्हणून जातीच्या प्रमाणपत्रासाठी जाणीवपूर्वक अर्ज नवनीत राणांनी ( MP Navneet Rana caste verification case ) केला होता असा उच्च न्यायालयाने निष्कर्ष काढला होता. त्यानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. मात्र दोषारोपपत्र दाखल झालेल्या दंडाधिकारी न्यायालयात कामकाज सुरूच होते.

काय आहे प्रकरणअमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana caste verification case ) आणि त्यांचे वडील हरभजन सिंग यांच्यावर मुंबईतील मुलूंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. नवनीत राणा यांनी त्यांच्या जातीचा बनावट दाखला दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात खटला चालू आहे. यानंतर राणा आणि त्यांचे वडील यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. जो दंडाधिकारी न्यायालयाने फेटळून ( Non Bailable Warrant Against MP Navneet Rana )लावला आहे. त्यानंतर या निर्णयाला नवनीत राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टात अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करत सत्र न्यायालयाने शिवडी न्यायालयाचा ( MP Navneet Rana caste verification case ) निर्णय योग्य ठरवून तोच निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details