मुंबई- सर्वसामान्य प्रवाशांना लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी आधुनिक तंत्रज्ञान व अधिक सोयी असणाऱ्या विना वातानुकूलित शयन-आसन (sleeper sitter) बसचा लोकार्पण सोहळा परळ बसस्थानकात पार पडला. सर्वसामान्य प्रवाशी रोहित धेंडे यांच्या हस्ते व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्या प्रमुख उपस्थितीत परळ बस आगारात परेल-भटवाडी (पाटगांव ) ही बस सोडून हा सोहळा संपन्न झाला.
एसटीची विना वातानुकूलित शयन-आसन बस प्रवाशांच्या सेवेत
एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार आतापर्यंत विविध बससेवा सुरू आहेत. सध्यस्थितीला साध्या, जलद, रातराणी, हिरकणी, वातानुकूलित शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा विविध बस सेवेद्वारे दररोज सरासरी 67 लाख प्रवाशांना नियमित व सुरक्षित प्रवासी दळणवळण सेवा एसटी महामंडळामार्फत पुरविली जाते.
हेही वाचा -अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह 8 जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गासाठी
एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार आतापर्यंत विविध बससेवा सुरु आहेत. सध्यस्थितीला साध्या, जलद, रातराणी, हिरकणी, वातानुकूलित शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा विविध बस सेवेद्वारे दररोज सरासरी 67 लाख प्रवाशांना नियमित व सुरक्षित प्रवासी दळणवळण सेवा एसटी महामंडळामार्फत पुरविली जाते. शयन आणि आसन अशा नवीन प्रकारच्या 16 बसेस आमच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मुंबईतून महामार्गावर गाडी काढण्यासाठी वाहतूककोंडीमूळे खूप वेळ लागतो, यावर काही मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे देओल यांनी सांगितले.
- आरामदायी शयन-आसन बसची वैशिष्ट्ये -
- सदर बस 12 मीटर लांबीची असून मजबूत अशा माईल्ड स्टील मध्ये बांधण्यात आली आहे. त्यामुळे या वाहनामध्ये प्रवाशांना पुरेशी जागा उपलब्ध आहे.
- लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसमध्ये 30 आरामदायी पुश बॅक आसने व 15 शयन (बर्थ) आहेत.
- सदर गाडीला हवेचा अवरोध कमी होण्यासाठी एरोडायन्यामिक आकार देण्यात आलेला असून पुढील व मागील शो आकर्षक एफआरपी मध्ये तयार केलेला आहे.
- पुढील व मागील बाजूस एलईडी मार्गफलक बसविलेले आहेत.
- चालक कॅबिनमध्ये अनाऊन्सिंग सिस्टीम बसविली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी बल्कहेड पार्टीशनर हूटर बसविण्यात आलेला असून त्याचे बटण चालक कक्षात देण्यात आलेले आहे.