मुंबई -राज्यात विधानसभा निवडणूक घोषीत होऊनही घाटकोपर पश्चिमच्या इच्छुक उमेदवारांनी 169 विधानसभा निवडणूक केंद्र वर्षानगर येथून एकही अर्ज घेऊन गेले नाही. इच्छुकांची पितृपक्ष संपल्यानंतर आणि घटस्थापना मुहूर्त पाहून अर्ज विक्री होण्याची शक्यता आहे.
मुंबई : घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी एकही अर्ज विक्री नाही राज्यात तसेच मुंबई शहर व उपनगरात शुक्रवारपासून प्रत्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून पूर्व उपनगरातील 6 विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक 21 ऑक्टोबरला होणार आहे. तर उमेदवारी अर्जाची विक्री आणि अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत.
हे ही वाचा -शिवसेनेचे सहदेव बेटकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, तटकरेंची घेतली भेट
घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी दोन दिवस झाले तरी अद्याप अर्जांची विक्री झालेली नाही. उमेदवार अर्जासोबत दाखल सादर करायची कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र तसेच इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी माहिती गोळा करत आहेत. मात्र, या केंद्रावरून दोन दिवसात एकही अर्ज विक्री झाला नसल्याचे एक खिडकी केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. पितृपक्ष संपून रविवारपासून नवरात्री सुरु होणार असल्याने सोमवार पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा -'ईडी' चौकशीचा व भाजपचा काही संबंध नाही - चंद्रकांत पाटील