महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची आवाज तपासणी - Pollution Control Board Noise inspection of firecrackers

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. कोरोना काळात मुंबईमधील ध्वनी आणि वायू प्रदूषण पातळी सुधारली होती. मात्र, दिवाळीत पुन्हा हे प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या फटाक्यांची आवाजाची पातळी तपासणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशनने केली.

Noise inspection of firecrackers by Pollution Control Board
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची आवाज तपासणी

By

Published : Oct 22, 2021, 2:05 AM IST

Updated : Oct 22, 2021, 2:27 AM IST

मुंबई -दिवाळी उत्सवात फटाके न वाजवता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केली जावी, याकरीता गेल्या काही वर्षापासून व्यापक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जनजागृती केली जात आहे. त्याचा दृष्य परिणाम दिसू लागला असून दरवर्षी फटाके वाजविण्याच्या प्रमाणात घट दिसून येत आहे. यावर्षीही बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या ध्वनीची चेंबूर येथे तपासणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आवाज फाऊंडेशन या संस्थेच्या सहयोगाने आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता आवाक्यात ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दरवर्षी नियोजन करण्यात येते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे याबाबत बोलताना

30 फटाक्यांची पातळी तपासली -

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. कोरोना काळात मुंबईमधील ध्वनी आणि वायू प्रदूषण पातळी सुधारली होती. मात्र, दिवाळीत पुन्हा हे प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या फटाक्यांची आवाजाची पातळी तपासणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशनने केली. यावेळी बाजारातील सामान्य फटाके आणि ग्रीन फटाके, असे एकूण 30 फटाक्यांच्या फोडल्यानंतर आवाजाची पातळी डीबी मीटरने तपासण्यात आली. यात फक्त दोन फटाके वगळता इतर फटाक्यांची पातळी समाधानकारक आढळली आहे.

हेही वाचा -सरकारने शिवस्मारक बासनात गुंडाळले; विनायक मेटे यांचा आरोप

उत्सवात फटाके न वाजवता प्रदूषणमुक्त दिपावली साजरी केली जावी याकरीता गेल्या काही वर्षापासून व्यापक जनजागृती केली जात आहे. त्याचा दृष्य परिणाम दिसू लागला असून दरवर्षी फटाके वाजविण्याच्या प्रमाणात घट दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी तपासण्यात आलेल्या फटाके हे बऱ्यापैकी नियमात दिसून आले आहेत. ज्या फटाक्यांनी नियम पाळले नाहीत त्याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे यांनी सांगितले.

Last Updated : Oct 22, 2021, 2:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details