महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेहमीच वर्दळीने गजबजलेल्या मुंबईतील टिळक भवनात शुकशुकाट!

देशभरात मोदी लाट नव्हे तर मोदी त्सुनामी आली असल्याचे हळूहळू उघड होणाऱ्या निवडणूक निकालांच्या कलावरून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने बाकी सर्व आघाड्यांना पुरते झोपवले आहे.

By

Published : May 23, 2019, 6:38 PM IST

Updated : May 23, 2019, 6:54 PM IST

नेहमीच वर्दळीने गजबजलेल्या मुंबईतील टिळक भवनात शुकशुकाट!

मुंबई- कार्यकर्त्यांच्या वर्दळीने सतत गजबजलेल्या काँग्रेसच्या टिळक भवनात स्मशान शांतता दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही शांतता दिसल्याने काँग्रेसच्या गोटात चिंता व्यक्त होत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकाच जागेवर सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. राष्ट्रवादीला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर युती ४३ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे लोकसभा सेमीफायनल म्हणून ज्या निवडणुकीकडे पाहिले जात होते. त्या सेमीफायनलमध्ये काँग्रेसला जोरदार फटका बसत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. हा धक्का इतका जोरदार बसला आहे की, येथील परळ इथल्या काँग्रेसच्या टिळक भवनात शुकशुकाट दिसत आहे.

देशभरात मोदी लाट नव्हे तर मोदी त्सुनामी आली असल्याचे हळूहळू उघड होणाऱ्या निवडणूक निकालांच्या कलावरून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने बाकी सर्व आघाड्यांना पुरते झोपवले आहे. कार्यालयात एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी उपस्थित नाही. वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यात आत्मविश्वास नाही.

साहेब, मतेही मिळेना, जातो आता घरी -
दुपारनंतर एक दोन कार्यकर्ते दिलासा देण्यासाठी टिळक भवनात आले होते. पुढील काही फेरी झाल्यानंतर तेही बाहेर पडत असताना एका कार्यकर्त्याने ‘आमच्या सीटला मते पण मिळेना. साहेब, जातो आता घरी’, असे म्हणताच मोठा हशा पिकला. याबाबत आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रमिला पवार यांनी....

Last Updated : May 23, 2019, 6:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details