मुंबई :मध्य रेल्वेवर ( Central Railway ) नेहमीच लांबच्या पल्याच्या रेल्वे मेल आणि एक्सप्रेस सातत्याने ये-जा करत असतात. त्यासोबत लोकलही दिवस आणि रात्र तिन्ही पाळीमध्ये धावत असते. मात्र या रविवारी दिवाळी असल्यामुळे मेगाब्लॉकलाच मध्य रेल्वेने सुट्टी दिलेली ( Sunday megablock cancel ) आहे.
दिवाळीमुळे मेगाब्लॉकला सुट्टी :लाखो लोक रोज लोकलमधून प्रवास करतात. त्यासाठी देखभाल दुरुस्ती म्हणून मेगा ब्लॉक दर रविवारी आयोजित केला जातो. मात्र या रविवारी दिवाळी असल्यामुळे मेगाब्लॉक ( Diwali Occasion ) नाही आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना दिली.
देखभाल आणि दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक :दर रविवारी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या ठिकाणी मेगाब्लॉक असतो. या रविवारी 23 ऑक्टोबर रोजी पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक नसेल. मेगा ब्लॉक हे दर रविवारी नेहमीच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी केले जातात. विविध तांत्रिक आणि इलेक्ट्रिकल कामे या वेळेला केली जातात. त्यामुळे रेल्वेची सर्व यंत्रणा रेल्वे मार्ग अद्ययावत राहतात असे रेल्वेचे म्हणणे आहे. मात्र या रविवारी पश्चिम रेल्वेवर लोकलला कोणताही जम्बो मेगाब्लॉक नसेल. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी ईटीवी भारत सोबत संवाद साधताना दिली.
मुंबईकरांची गैरसोय दूर :दिवाळीचा सण असल्याने आणि त्यातही रविवार असल्याने खरेदीसाठी अनेक नागरिक घराबाहेर पडतात. फिरण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर घराबाहेर असतात. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक राजधानीतील नागरिकांची हेळसांड होऊ नये त्यासाठी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मेगाब्लॉक रद्द करण्यात आला असला तरी रविवारच्या वेळापत्रकानुसार रेल्वेच्या फेऱ्या होणार आहेत.