मुंबई -सततच्या इंधन दरवाढ आणि निर्बंधामुळे एसटी महामंडळाला दररोज तोटा होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच एसटी महामंडळाने 17 टक्के एसटीचे भाडेवाढ करण्याबाबत संचालक महामंडळाची चर्चा झाली होती. तसा प्रस्तावही एसटी महामंडळाने तयार केला आहे. मात्र, अद्याप या प्रस्ताव मंजूर झालेला नाही. त्यामुळे तूर्तास प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे.
प्रस्तावाला मिळाली मंजुरी
कोरोनामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. त्यामुळे कामगारांना पगार देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नाही. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळेही पूर्ण क्षमतेने बसेस धावत नाहीत. त्यात सततच्या इंधन दरवाढीमुळे दुहेरी फटका एसटी महामंडळाला बसत आहे. तोटा कमी करण्यासाठी महामंडळाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, सर्वात महत्वाचे प्रवासी नससल्याने या प्रयत्नाला यश येत नाही आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाने 17 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव सुद्धा तयार केलेला आहे. नुकताच एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली आहे. या प्रस्तावाला बैठकीत मान्यताही देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
इंधन दरवाढीमुळे 2 कोटीचा फटका