मुंबई :कोविडचा नवा व्हेरियंट, अवतार बीएफ 7 नवीन व्हेरियंटमुळे पुनः तिसरी लाट येते की ( No Protocol For Covid 19 Virus at Mumbai Airport ) काय, अशी शंकेची पाल चुकचकते आहे. कारण जनतेच्या मनात मागील ( No Protocol at Mumbai International Airport ) अनुभव आहे. आता ब्राझील, द. कोरिया, जापान आणि सर्वात चर्चेचा विषय ठरला ( Mumbai Airport Regarding Corona Virus ) चीन देश होय. या देशांत कोविड-१९ चे संक्रमित रुग्णसंख्या ( Airport Spokesperson Information ) वाढत आहे. त्यामुळे भारतातही चिंता ( Mumbai International Airport Regarding Corona ) वाढली आहे. केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला सावधानतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाबाबत महाराष्ट्र शासनही सतर्क झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोविड-19 ची परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेणार आहेत. मात्र, कोविड संसर्ग पसरण्याची शक्यता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमान प्रवास ही आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणतेही कोविड प्रोटोकॉल किंवा चाचण्या सुरू झाल्या नाहीत. त्याठिकाणी जाऊन ईटीव्ही प्रतिनिधी श्याम सोनार यांनी वस्तुस्थिती मांडली आहे जाणून घेऊया यावरील सविस्तर रिपोर्ट.
कोरोना महामारीच्या कारणामध्ये आंतरराष्ट्रीय विमान प्रवास ठरलेय महत्त्वाचे कारण :कोरोना महामारीची सुरुवात होण्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महत्त्वाचे मूलभूत कारण ठरले होते. बीएफ 7 हा होंगकाँगमधून चीनमध्ये पसरला. त्यामुळे चीनमध्ये हाहाकार उडाला. या घटनेमुळे मागील अनुभवातून केंद्र शासन आणि विमानतळ प्राधिकरण यांनी काही धडा घेऊन खबरदारी घेतली आहे काय हे पाहणे आवश्यक होते. कोविड १९ संक्रमित रुग्ण किंवा सदृश्य रुग्ण यांची ओळख त्वरित होणे अत्यावश्यक आहे. मात्र, प्रत्यक्ष विमानतळावर ईटीव्ही प्रतिनिधी श्याम सोनार यांनी भेट दिली असता, कोणत्याही रॅपिड अँटिजेन टेस्ट, थर्मल टेस्टशिवाय कडक कोविड-१९ मार्गदर्शक नियमांचे पालन होत नसल्याचे दिसले.
महाराष्ट्र सरकार लवकरच एक टास्क फोर्स स्थापन करणार :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी राज्याची कोविड-19 परिस्थिती आणि तयारीचा आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान घेणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचे निर्बंध येणार का, पुन्हा मास्क घालणे आवश्यक आहे का? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले की, कोविड-19 परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच एक टास्क फोर्स स्थापन करणार आहे. यावर राज्य सरकार केंद्र सरकार आणि त्यांच्या यंत्रणांशी समन्वय साधेल, असे त्यांनी सांगितले. किंबहुना, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केलेल्या प्रश्नाला फडणवीस उत्तर देत होते. महाराष्ट्र राज्यात 21 डिसेंबरपर्यंत 135 कोविड रुग्ण :अलिकडच्या आठवड्यात, चीनच्या शहरांमध्ये कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जरी 2020 आणि 2021 मध्ये महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा मोठी आहे.