महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chief Minister Uddhav Thackeray : जनतेच्या सेवेत राजकारण नको, मुख्यमंत्र्यांचा सल्ला

संभाजीनगरच्या रहिवाशांना दिलेली वचने बऱ्याच प्रमाणात पूर्ण केली आहेत. त्यामुळे संभाजीनगरवासियांनी पालिकेचा भगवा उतरू दिला नाही, याचा सार्थ अभिमान आणि आत्मविश्वास आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) म्हणाले. ऑनलाइन पद्धतीने नाट्यगृहाच्या वास्तूचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री
मुख्यमंत्री

By

Published : Jan 25, 2022, 10:07 PM IST

मुंबई- गेल्या तीन-चार वर्षांपासून बंद असलेले औरंगाबाद येथील संत एकनाथ नाट्यगृहाचा आज (दि. २४ जानेवारी) पडदा उघडला. दरम्यान, जनतेची सेवा करताना राजकारण मध्ये येऊ देऊ नका, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी दिला. ऑनलाइन पद्धतीने नाट्यगृहाच्या वास्तूचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. औरंगाबाद विमानतळाचे ( Aurangabad Airport ) छत्रपती संभाजीनगर, असे नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उद्याने अन् नाट्यगृहाकडे विशेष लक्ष द्यायला हवे - संभाजीनगरच्या रहिवाशांना दिलेली वचने बऱ्याच प्रमाणात पूर्ण केली आहेत. त्यामुळे संभाजीनगरवासियांनी पालिकेचा भगवा उतरू दिला नाही, याचा सार्थ अभिमान आणि आत्मविश्वास आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मागील तीन ते चार वर्षांपासून हे संत एकनाथ नाट्यगृह बंद होते. मागील वर्षात नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम वेगाने पूर्ण झाले आहे. हे रंगमंदिर आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोयी सुविधांनी युक्त झाले आहे. औरंगाबादला सर्व सुविधा देणार, उद्याने आणि नाट्यगृहांकडे विशेष लक्ष द्यायला हवे. कारण, औरंगाबाद शहर आता फार बदल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच जनतेची कामे करताना राजकारण मधे येऊ देऊ नका, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.

लवकरच केंद्राकडून विमानतळाच्या नामांतरास मंजुरी मिळेल - औरंगाबादला ( Aurangabad ) छत्रपती संभाजी नगर ( Chhatrapati Sambhaji Nagar ) नामांतरणाच्या मुद्द्यांवरुन फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सुनावले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत म्हणाले, निवडणुका आल्या की बोलायचे, टाळ्या वाजवून घ्यायच्या, मते मिळवायची आणि वचनाकडे पाठ फिरवायची. पण, शिवसेना त्या संस्कृतीतील नाही. संभाजीनगरच्या विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव आपण दिल्लीला पाठवला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नाव न घेता भाजपला चिमटा - आजचा कार्यक्रम हा शासकीय आहे. त्यामुळे मला इथे राजकारण आणायचे नाही. जी कामे महाराष्ट्र शासनाच्या दारी अडली आहेत, ती मला सांगा. तुमचे पालकमंत्री सुभाष देसाई ( Guardian Minister Subhash Desai ) काम करत आहेत. दिल्लीमध्ये भागवत कराड आणि रावसाहेब दानवे काम करत आहेत. त्यामुळे राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवावे. जनतेची सेवा करताना राजकारण मध्ये येऊ न देता आपण कामे करावीत. आपण माणसं आहोत. विरोधी पक्षात गेले म्हणजे रुसून बसायचे असे होत नाही, असा अप्रत्यक्ष चिमटा भाजपचे नाव न घेता काढला. तसेच जनतेची कामे करण्यासाठी एकमत आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती दाखवून द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्षांना केले.

ABOUT THE AUTHOR

...view details