महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ललित पाटील प्रकरणात कोणालीही सोडणार नाही - देवेंद्र फडणवीस - Fadnavis reply to opposition

Lalit Patil drug case : ललित पाटील प्रकरणावरून विरोधी पक्षानं हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी ललित पाटील प्रकरणात कोणालाही माफ केलं जाणार नाही, असं राज्याचे गृहमंत्री, तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं.

Lalit Patil drug case
Lalit Patil drug case

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 4:42 PM IST

अंबादास दानवे प्रश्न विचारताना

मुंबई Lalit Patil drug case :ललित पाटील प्रकरणात गरज पडल्यास कोणालीही अटक करण्यात मागपुढं पाहणार नाही. या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी राज्य सरकार दररोज छापे टाकून कारवाई करत आहे. ड्रग्ज प्रकरणात सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, असं देखील फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं.

काय म्हणाले गृहमंत्री :ललित पाटील ड्रग्ज प्रकरणासंदर्भात विधान परिषद सभागृहात चर्चा झाली. उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणांमध्ये पोलिसांचा अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग नसल्याचं उत्तर दिलं. मात्र, पोलिसांनी त्यांचं कर्तव्य नीट पार पाडलं नाही, त्यामुळं त्यांच्यावर कारवाई केली, असं फडणवीस म्हणाले. तसंच या प्रकणारत चार पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं आहे, दोघांना अटक करण्यात आली असून सहा जणांना निलंबित करण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.



नार्कोटिक टेस्ट करा सचिन अहिर :ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावर मंगळवारी विधान परिषदेत चर्चा झाली. त्यावर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी प्रश्न उपस्थित केला. एका कैद्याला 7 महिने ससूनमध्ये ठेवलं जातं. तिथंच ड्रग्ज सापडतात. त्यानंतर आरोपी ससूनमधून फरार होतो. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे, असं सचिन अहिर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ललित पाटील याला दक्षिण भारतातून अटक करण्यात होती. त्यामागं कोणाची ताकद आहे, याचा शोध घेतला पाहिजे. याप्रकरणी काहींना अटक करण्यात आली होती. मात्र ललित पाटीलवर उपचार करणाऱ्या संजीव ठाकूर यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणात त्यांची नार्को चाचणी करण्याची मागणी अहिर यांनी केली.

ललित पाटीलला बेड कसा मिळतो ? : याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला सवाल केला आहे. ललित पाटीलला नऊ महिने बेड रेस्ट कसा मिळाला? एकीकडं ससून रुग्णालयात रुग्णांसाठी बेड नाहीत. मात्र ड्रग्ज माफिया ललित पाटील याला 9 महिने राहण्यासाठी बेड मिळतो, ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. ससून रुग्णालयाच्या निलंबित डीनवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. संभाजीनगर, खोपोली, नाशिक येथील अवैध अमली पदार्थांच्या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असं ते म्हणाले. यावर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बंद कारखान्यात औषधसाठा सापडला आहे. एमडीसारखे ड्रग्ज विकसित केले जात आहेत. बंद कारखान्याला भेट देऊन माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा -

  1. छगन भुजबळांना धक्का? 'महाराष्ट्र सदन' घोटाळा प्रकरणात मोठा ट्विस्ट
  2. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ४ सदस्यानंतर आता थेट अध्यक्षांनी दिला राजीनामा; कारण काय?
  3. शरद पवार यांचा आज वाढदिवस; शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार घेणार का भेट, चर्चेला उधाण

ABOUT THE AUTHOR

...view details