महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चेंबूरमध्ये रास्ता रोको, जमावाची बसवर दगडफेक - चेंबर रास्ता रोको

जमाव बसकडे येत होता. त्यावेळी बसमधील प्रवाशांना बसच्या आत झोपण्याचे आदेश दिले. त्यावेळी सर्व प्रवासी बसच्या आत झोपले. दगडफेक पाठीमागून करण्यात आली. त्यामुळे कोणीही प्रवासी जखमी झाले नसल्याचे मुरुड आगाराचे एसटी चालक राकेश लक्ष्मण साळुंके यांनी सांगितले.

चेंबूरमध्ये रास्ता रोको

By

Published : Oct 23, 2019, 8:51 AM IST

Updated : Oct 23, 2019, 11:39 AM IST

मुंबई - कुर्ला ठक्कर बाप्पा कॉलनी येथून पंचराम राठाडिया यांची अंत्ययात्रा चेंबूरच्या दिशेने येत असताना झालेल्या राड्यात काही नागरिक व पोलीस जखमी झाल्याची घटना घडली. यामध्ये काही वाहनावर जमावाने दगडफेक केली. मुरुड आगराच्या बसच्या पाठिमागील काचा फुटल्या. मात्र, कुठलाही प्रवासी जखमी झाला नाही.

चेंबूरमध्ये रास्ता रोको, जमावाची बसवर दगडफेक

कुर्ला ठक्कर बाप्पा येथील रहिवासी पंचराम राठाडिया यांची आपली मुलगी ६ महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्यांच्या मुलीचा शोध लागला नसल्याने त्यांनी १० दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. यादरम्यान नातेवाईक व त्यांच्या कुटुंबाने घटनेचा शोध लागत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यासाठी अंत्ययात्रा चेंबूरच्या समशानभूमीकडे जाताना कुर्ला पनवेल मार्गावरील छगन पेट्रोल पंप समोर जमावाने रास्ता रोको केला. यामध्ये एसटी बस व इतर वाहनावर दगडफेक करण्यात आली.

जमाव बसकडे येत होता. त्यावेळी बसमधील प्रवाशांना बसच्या आत झोपण्याचे आदेश दिले. त्यावेळी सर्व प्रवासी बसच्या आत झोपले. तसेच दगडफेक पाठीमागून करण्यात आली. त्यामुळे कोणीही प्रवासी जखमी झाले नसल्याची माहिती, मुरुड आगाराचे एसटी चालक राकेश लक्ष्मण साळुंके यांनी दिली.

Last Updated : Oct 23, 2019, 11:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details