मुंबई - मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार होत असताना ( Corona Patients in Mumbai ) पावसाळी साथीच्या आजारांनी डोकेवर काढले होते. ( Viral Infection Mumbai ) यामुळे आरोग्य विभागावरील ताण व डोकेदुखी वाढली होती. मात्र, गेल्या डिसेंबर महिन्यात आढललेल्या रुग्णांच्या तुलनेत म्हणजे महिनाभरात मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो, डेंग्यू या आजाराचे रुग्ण निम्म्याने घटले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आरोग्य विभागावर भार -
मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मुंबई महापालिकेचा कोरोना विरोधात लढा सुरु आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना साथीच्या आजारांचा ताप वाढला. त्यामुळे आरोग्य विभागासमोर आव्हान उभे राहिले होते. डिसेंबर महिन्यापासून कोरोनाची तिसरी लाट आली. तिसऱ्या लाटेत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येपेक्षा वाढ झाली. दिवसाला २० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या वाढत असली तरी ९० टक्के रुग्ण घरीच राहून बरे होत होते. तरीही या रुग्णांना क्वारेंटाईन, आयसोलेशनमध्ये ठेवणे त्यांच्या प्राकृतीची चौकशी, तपासणी करणे, त्यांच्या चाचण्या करणे आदी कामाचा आरोग्य विभागवार भार वाढला आहे.