महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदींच्या कार्यकाळात एकही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही, संरक्षणमंत्र्यांचा अजब दावा - terror

दक्षिणेत ही आम्ही प्रचार केला, त्यात आम्ही देशाच्या विकासावर बोलत असताना, जनतेकडून बालाकोट बाबत बोला असा आग्रह करण्यात येत असल्याचे सीतारमण म्हणाल्या.

संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण

By

Published : Apr 25, 2019, 6:02 PM IST

मुंबई - मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या काळात एकही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही. मोदी सरकारने दहशतवादाबाबत अतिशय कठोर भूमिका वारंवार मांडली आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले. त्या मुंबईत आयोजीत एका पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण


सीतारमण म्हणाल्या, आम्ही प्रचारामध्ये सेनेचा वापर करत नाही. २००८ साली मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारने काही भूमिका घेतली नाही. पण आता पुलवामानंतर सरकारने घेतलेली भूमिका महत्वाची असल्याचे आम्हाला वाटते. ही आमची निर्णय क्षमता आहे. या निर्णय क्षमतेबद्दल बोलणे काँग्रेसला रुचत नाही.

गेल्या पाच वर्षात आम्ही केलेल्या कामांबाबत जनतेमध्ये प्रचार करत आहे. आता जनताच राष्ट्रीय सुरक्षेबाबत अधिक जागरूक झाली आहे. राजकीय पक्षांनी सुरक्षेबाबत आश्वस्त करावे अशी त्यांची अपेक्षा आहे. दक्षिणेत ही आम्ही प्रचार केला, त्यात आम्ही देशाच्या विकासावर बोलत असताना, जनतेकडून बालाकोट बाबत बोला असा आग्रह करण्यात येत असल्याचे सीतारमण म्हणाल्या.

युपीए सरकारच्या तुलनेत आत्ताच्या सरकारने तिप्पट मदत शेतकऱ्यांना केली आहे. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवली आहे. याचा लाभ २ कोटी शेतकऱ्यांना होत आहे. मात्र शेतकरी आत्महत्या हा संवेदनशील विषय आहे. सरकार याबाबत कार्यशील आहे

सीतारमण म्हणाल्या..
- श्रीलंकेतील हल्ल्याचा निषेध, भारत श्रीलंकेच्या पाठीशी, आवश्यक वाटल्यास श्रीलंकेला मदत करु.
- साध्वी प्रज्ञा सिंह यांचे मत व्यक्तीगत
- अफस्पा कायदा बदलून काश्मीरमधून सैन्यबळ कमी करण्याची भाषा काँग्रेसची, आम्ही हे होऊ देणार नाही
- विरोधी पक्ष बालकोटच्या घटनेचे पुरावे मागतात तेव्हा दुःख होते.
- विरोधकांची भाषा पाकिस्तानला रुचणारी
- राफेलबाबत काँग्रेस बिनबुडाचे आरोप करत आहे

ABOUT THE AUTHOR

...view details