महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vilasrao Deshmukh Abhay Yojana: आता विजेचे थकबाकी भरल्यास व्याज व दंड माफ! - विजेचे थकबाकी

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ (shri Vilasrao Deshmukh Abhay yojana) जाहीर केली आहे. या योजनेचा कालावधी १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत होता. आता त्यात मुदतवाढ केली गेली आहे.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana
Vilasrao Deshmukh Abhay Yojana

By

Published : Nov 3, 2022, 9:12 PM IST

मुंबई:कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ (Vilasrao Deshmukh Abhay yojana) जाहीर केली आहे. या योजनेचा कालावधी १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत होता. आता त्यात मुदतवाढ केली गेली आहे. आता 31 डिसेंबर 2022 पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

नवीन व्यवसायांना देखील लाभ: औरंगाबाद परिमंडलात अशा वीज ग्राहकांची संख्या सुमारे पावणेतीन लाख असून या योजनेमुळे त्यांच्याकडील सुमारे ५६१ कोटी रुपयांच्या थकीत वीजबिलाच्या वसुलीला गती मिळणार आहे. आधी या योजनेचा कालावधी १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत होता. ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू आहे. ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येत होता. आता त्याची मुदत 31 डिसेंम्बर 2022 पर्यंत वाढवली आहे. महावितरणने सांगितले आहे की, नवीन व्यवसाय ज्यांना करायचा आहे त्यांना देखील याचा लाभ मिळू शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details