नागपूर -आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला ( Devendra Fadnavis on Law against Love Jihad ) नाही. परंतू या संदर्भात विविध राज्यांनी केलेल्या कायद्यांचा अभ्यास करू, असे 'लव्ह जिहाद' विरोधात कायदा करण्याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले ( Shraddha Murder Case ) आहे.
Love Jihad : लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याबाबत अद्याप निर्णय नाही - देवेंद्र फडणवीस - लव्ह जिहाद विरोधात कायदा
लव्ह जिहाद कायद्या संदर्भात अभ्यास करू, अद्यार त्याविरोधात कायदा करण्यात आला ( Devendra Fadnavis on Law against Love Jihad ) नाही, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ते मुंबईत बोलत होते. राज्यभरात या घटनेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलने होत आहेत.
हिंदु्त्ववादी संघटनांकडून आक्रोश :हिंदु्त्ववादी संघटनांकडून श्रध्दा वलेकर हत्याकांडाला (Shraddha Walekar massacre ) लव्ह जिहाद (Love Jihad) संबोधले जात आहे. हिंदु्ववादी संघटनानी या घटनेच्या निषेधार्थ आक्रोश सभा (Hindu organization Outcry meeting) घेतली होती. दिल्ली येथे श्रद्धाचा लव्ह जिहादने बळी घेतला असून, आज दिल्लीत घडले ते उद्या पुण्यात घडू शकते, असे मतही त्यांनी मांडले. याकरिता हिंदूत्ववादी संघटनांकडून कोथरूडच्या करिष्मा चौकामध्ये आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरात संघटनेकडून श्रद्धा हत्याकांडाच्या निषेधार्थ (Protest against Shraddha Walekar massacre) आंदोलन करण्यात आले आहे.
आफताबला कठोर शिक्षा देण्याची मागणी :या आंदोलनाममध्ये अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिक सहभागी झाले होते. आक्रोश सभेत घोषवाक्ये लिहिलेले बॅनर्स राज्यभर घेऊन आंदोलन करण्यात आले. वसईचे श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हे लव जिहाद आहे. याला लव म्हणता येत नाही, अशी सगळी या नागरिकांची आणि संघटनाची भूमिका ङोतली होती. दिल्लीमध्ये श्रद्धा वलेकर यांची हत्या करण्यात आली. आफताब नावाच्या व्यक्तीने ही हत्या केली आणि तिच्या शरीराचे 35 तुकडे करून वेगवेगळ्या परिसरात फेकण्यात आले. हा सगळा प्रकार हिंदूविरोधी असून त्यासाठी ही आक्रोश सभा घेण्यात आल्याचे सभांमधील आयोजकांनी सांगितले होते. हिंदुत्ववादी संघटकांनी घोषणाबाजी करत आरोपी आफताबला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.