मुंबई- कर्नाटकच्या राजकीय नाट्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवारी) निर्णय दिला. न्यायालयाने बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर नियमानुसार निर्णय घेण्याचा अधिकार हा कर्नाटकाच्या विधानसभा अध्यक्षांनाच दिला आहे. त्याचबरोबरच बंडखोर आमदारांना उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणे बंधनकारक नाही, असेही न्यायालयाने सांगितले.
उद्या कुमारस्वामी सरकारची परीक्षा; तर बंडखोर आमदारांना न्यायालयाचा दिलासा - karnatak
कर्नाटक सरकार आमदारांच्या राजीनाम्यामुळे अल्पमतात आले आहे. उद्या कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करताना सरकारची गोची होण्याची शक्यता आहे.
कर्नाटक सरकार आमदारांच्या राजीनाम्यामुळे अल्पमतात आले आहे. उद्या कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करताना सरकारची गोची होण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे उद्या काँग्रेस आणि जेडीएसच्या सरकारला उद्या बहुमत सिद्ध करावे लागेल. जर त्यांना बहुमत सिद्ध करता नाही आले तर त्यांचे सरकार पडू शकते व याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो. उद्या होणार्या बहुमत चाचणी बद्दल बोलताना आमच्याकडे बहुमत आहे आणि मुख्यमंत्री कुमारस्वामी हे राजीनामा देतील असा दावा भाजपचे येदियुरप्पा यांनी केला आहे.
सर्व आमदार मध्य रात्री गेले दिल्लीला गेल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटकचे बंडखोर आमदार आणि कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यांनी दाखल केलेल्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, निकाल आजसाठी राखून ठेवला होता. उद्या विश्वासदर्शक ठरावात कुमारस्वामी सरकार पडणार की तरणार हे समजेल.