मुंबई- कोरोनाचा प्रसार बघता नागरिकांनी आवश्यक प्रवास टाळावे. मंदिर, मशीद आणि इतर सार्वत्रिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
माहिती देतान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी पार्क, मॉल, समुद्र किनारे अशा सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. कोणत्याही शहराला लॉकडाऊन करण्याचा विचार नसून लोकांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
रेल्वे, लोकल, बसेसमध्ये स्वच्छता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३९ झाली असून कोरोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी रुग्णालयांसोबत हॉटल्सची व्यवस्था देखील करण्यात आल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. तसेच, प्रत्येक गोष्टीसाठी कायदा करू शकत नाही. राज्याच्या दृष्टीने पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. गरज असेल तरच बाहेर पडावे. हॉटेल्स बंद करण्याचा सध्या निर्णय नाही आणि कोणत्याही शहराला लॉकडाऊन करणार नाही. राज्याची आर्थिक घडी उद्ध्वस्त होणार नाही याची देखील काळजी घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
हही वाचा-'चायनामेड' विषाणूला दूर पळवण्यासाठी सहकार्य करा'