मुंबई : मुंबई आयआयटीमध्ये काही दिवसांपर्वी दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. दर्शन सोलंकीच्या आत्महत्येनंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे यांनी स्थापन केलेल्या चौकशी समितीने जाती-आधारित भेदभाव नाकारला आहे. जातीय भेदभावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढता येत नाही, असे त्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. त्यामुळे या संदर्भात पालकांचे म्हणणे आणि हे तपास यामध्ये विसंगती समोर दिसून येते, असे विद्यार्थी संघटनेचे म्हणणे आहे. राज्यसभेचे माजी खासदार आणि कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी देखील या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. तर विद्यार्थी संघटनांनी अहवाल पाहिल्यावर होळीच्या दिवशी या अहवालाची होळीच केली पाहिजे, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अंतरिम अहवाल : 12 सदस्य असलेला प्राध्यापक नंदकिशोर यांच्या पुढाकारातील आयटी मुंबईच्या तपास पथकाने जी चौकशी केली त्यामध्ये कोणतेही त्याला जातीय भेदभातून वागणूक दिली, अशा प्रकारचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. तसेच कोणतेही मादक द्रव्य सेवन केले नाही किंवा हत्या झाल्याचेही असे कोणतेही पुरावे त्यामध्ये आढळलेले नाही. अर्थात हा अंतरिम अहवाल आहे.
अहवाल स्वीकारू शकत नाही : यासंदर्भात राज्यसभेचे खासदार माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्यासोबत ईटीव्ही भारतने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, प्राध्यापक नंदकिशोर समिती आयआयटी मुंबई यांचा अहवाल कसा स्वीकारावा? साधा मूलभूत प्रश्न असा आहे की, दर्शन सोळंकी याचा मृत्यू झाल्यानंतर अनोळखी व्यक्तीकडून दर्शनच्या घरी आयटी च्या नावाने कसा काय फोन जातो? तसेच दुसरा प्रश्न पोस्टमार्टम करण्यापूर्वी त्याचे पालक किंवा नातेवाईक यांची कोणती संमती का घेतली नाही? या प्रश्नांचा मागोवा प्राध्यापक नंदकिशोर समितीच्या अहवालामध्ये कुठेच दिसत नाही. त्यामुळे हा अहवाल स्वीकारू शकत नाही. आम्हीच यासंदर्भातली केंद्र शासनाकडे मागणी केली होती. म्हणून तात्काळ दुसऱ्या दिवशी एसआयटी स्थापन करण्यात आली, हे देखील डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी नमूद केले.
जातीय-भेदाची वागणूक मिळाल्याचा आरोप:दर्शन सोळुंके याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी दर्शनला या ठिकाणी जातीय भेदभाव वागणूक मिळाली होती, असा आरोप केला होता. त्यामुळे दर्शनने पहिल्यांदा देखील असा प्रयत्न केला होता, त्यात तो यशस्वी झाला नव्हता. मात्र, दुसऱ्यांदा हा त्याचा प्रयत्न यशस्वी झाला. आमच्यापासून दर्शनला काळाने हिरावून नेल्याचे म्हटले होते. दर्शन सोळंकीचे काका यांनी देखील जातीय भेदभावातून संस्थात्मक खून झाल्याचे म्हटले होते. त्या रीतीने तपास करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.