महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nawab Malik नवाब मलिक यांचा जामीनावर वेळेअभावी सुनावणी नाहीच; 'या' दिवशी होणार पुढील सुनावणी - नवाब मलिक अटक

नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या निर्णयाविरोधात धाव घेतली आहे. नवाब मलिक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी होणार होती. मात्र वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही, आता या प्रकरणात पुढील सुनावणी सोमवारी होण्याची शक्यता आहे.

Nawab Malik
नवाब मलिक

By

Published : Jan 13, 2023, 10:53 PM IST

मुंबई : माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जामीन अर्जवर आज मुंबई उच्च न्यायालय सुनवणी होणार होती. मात्र सिरीयल क्रमांक 88 असल्याने आज सुनावणी होऊ शकली नाही. मागील सुनावणी दरम्यान देखील वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नव्हती. आता या अर्जावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांना ईडीने मागील वर्षी अटक केली होती.

मलिकांवर रूग्णालयात उपचार सुरू : मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टातील न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळताना गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, नवाब मलिक यांना जमीन खरेदी करताना माहीत होते की ही जमीन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरकडून विकत घेण्यात येत आहे. मुनिरा प्लंबर यांच्या जवाब महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याला नजर अंदाज केल्या जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायाधीश राहुल रोकडे यांनी जामीन अर्ज फेटाळताना म्हटले आहे. प्रकृतीच्या कारणामुळे मलिकांवर मागील काही दिवसांपासून कुर्ल्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.



हसीना पारकरच्या मुलाच्या जबाब महत्वाचा : दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलिशाह पारकर हा मुंबईत राहतो. गोवावाला कंपाऊंडचा काही भाग नवाब मलिक यांना विकल्याचा खुलासा त्याने केला. नवाब मलिक यांना फेब्रुवारी महिन्यात ईडीने मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली. अशात अलीशाह पारकरचा जबाब हा अत्यंत महत्त्वाचा ठरला. ज्यामुळे ईडीने मलिक यांच्याविरोधात खटला उभा करण्यास मोलाची मदत केली.


काय म्हणाला अलीशाह पारकर? : माझी आई दिवंगत हसीना पारकर ही गृहिणी होती. उदरनिर्वाहासाठी ती छोटे मोठे आर्थिक व्यवहार करत होती. तिच्या मालकीच्या मालमत्तेतून तिला भाडे मिळत असे. साधारण ३ ते ५ लाख रूपये भाडे तिला मिळत होतं. माझी आई (हसीना पारकर) रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची. दाऊदची बहीण अशीही तिची ओळख होती. त्यामुळे मालमत्तेशी संबंधित वादही ती मिटवत होती. दाऊद इब्राहिम (मामा) आणि माझी आई (हसीना पारकर) यांच्यातले संबंध हे चांगले होते. ते वारंवार एकमेकांशी फोनवरून बोलत होते. माझी आई तिच्या मृत्यूपर्यंत दाऊद आणि हसीना पारकर हे आर्थिक व्यवहार करत होते.

गोवावाला बिल्डिंगचा वाद : माझ्याकडे फारसा तपशील नाही मात्र मला हे माहित आहे की माझी आई हसीना पारकर दाऊद इब्राहिमच्या म्हणजेच माझ्या मामाच्या मालमत्तेवर लक्ष ठेवत होती. माझी आजी अमीना बी कासकर यांच्या नावावर या मालमत्ता होत्या. SAFEMA, NDPSA मुंबई २००८ मध्ये संलग्न केलं होतं. त्यानंतर इकबाल कासकर (माझे काका) यांनी दाऊद इब्राहिम म्हणजेच माझ्या मामाच्या मालमत्तेचा ताबा घेतला आणि त्यांची देखभाल सुरू केली. माझ्या आईचे (हसीना पारकर) दोन प्रमुख सहकारी होते. एक होता सलीम पटेल, दुसरा होता खालिद जो गाडी चालवत होता. शमीन म्हणून एकजण होता तो देखील माझ्या आईसाठी काम करत होता. सलीम पटेल हा कांद्याची खरेदी विक्री करत होता आणि मालमत्तेच्या व्यवहारातही होता. माझी आई हसीना पारकर आणि सलीम पटेल यांनी कुर्ल्यातील गोवावाला बिल्डिंगचा वाद मिळवला होता. तिथे ऑफिस सुरू करण्यात आलं आणि कंपाऊंडच्या काही भागावर ताबा मिळवला गेला होता.

यामुळे नवाब मलिकांना अटक : माझ्या आईच्यावतीने या मालमत्तेशी संबंधित वाद काय होता ते माहित नाही. मात्र सलीम पटेल त्या ऑफिसमध्ये बसून कामकाज पाहात असे. त्यानंतर माझी आई हसीना पारकरने तिच्या ताब्यात असलेला भाग नवाब मलिक यांना विकला होता. नवाब मलिक यांनी माझी आणि सलीम पटेल यांना नेमका किती मोबदला दिला ते मला माहित नाही असंही अलीशाह याने सांगितलं. मात्र नेमकं हेच वक्तव्य ईडीला नवाब मलिक यांच्या विरोधात मोठा पुरावा मिळाला. त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली.



नवाब मलिक यांच्यावर आरोप काय? : हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे.

नवाब मलिकांना दिलासा नाही : मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे. तर, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. गोवावाला कंपाउंडमधील जमीन ही कायदेशीर मार्गाने खरेदी केली असल्याचा दावा त्यांनी केला. सुमारे पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आज न्यायालयात काय निर्णय होणार याकडं सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांना अद्याप याप्रकरणात दिलासा मिळाला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details