मुंबई- शहरात नो पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस आणि महापालिकेकडून कारवाई केली जाते. दंडही वसूल केला जातो. मात्र मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनी आपले वाहन नो पार्किंगमध्ये उभे केले तरी त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे समोर आले आहे.
नो पार्किंगमध्ये मुंबईकरांना दंड, महापौरांवर मात्र कारवाई नाही - Mayors
शहरात नो पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस आणि महापालिकेकडून कारवाई केली जाते. दंडही वसूल केला जातो. मात्र मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनी आपले वाहन नो पार्किंगमध्ये उभे केले तरी त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे समोर आले आहे.
![नो पार्किंगमध्ये मुंबईकरांना दंड, महापौरांवर मात्र कारवाई नाही](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3841544-482-3841544-1563169222601.jpg)
मुंबईत वाहनांची संख्या जास्त असल्याने पार्किंगची समस्या आहे. यामुळे मुंबईकर रस्त्यावर जिथे मिळेल त्या ठिकाणी आपली वाहने पार्क करतात. मुंबईमधील काही रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून नो पार्किंग फलक लावले आहेत. या ठिकाणी वाहने उभी केल्यास त्या वाहन चालकाकडून दंड वसूल केला जातो. महापालिकेनेही रस्त्यावर उभी केलेली वाहने जप्त करत दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईकर नागरिकांकडून गेल्या सात दिवसात 23 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांना पार्क करण्यासाठी पुरेशी वाहनतळे नसताना वाहने जप्त करत दंड वसुली केली जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांकडून पार्किंग पॉलिसीला विरोध केला जात आहे. मात्र मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी नो पार्किंगच्या फलकाखाली उभी होती. एकीकडे मुंबईकरांवर पार्किंगबाबत कारवाई केली जात असताना महापौरांना मात्र हा नियम लागू नसल्याचे दिसत आहे.