मुंबई - आरोग्य, शिक्षण व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळे सामान्यांचे जगणे असह्य होत असल्याचे वक्तव्य मंत्री नितीन राऊत यांनी केले.
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा अर्थव्यवस्थेला फटका - नितीन राऊत - मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा अर्थव्यवस्थेला फटका
मोदी सरकारच्या धोरणांवर मंत्री नितीन राऊत यांनी टीका केली. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा फटका अर्थव्यवस्थेला बसला असल्याचे राऊत म्हणाले.
![मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा अर्थव्यवस्थेला फटका - नितीन राऊत Nitin raut comment on Modi Govt](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6157367-thumbnail-3x2-kakaka.jpg)
नितीन राऊत
पीक विमा योजना संपविण्याचा केंद्र सरकारकडून घाट घातला जात असल्याचेही राऊत म्हणाले. हंगामी पीकविमा योजनेवर सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रीमियममध्ये 100 टक्के कपात करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची योजना मोदी सरकारने योजना आखली आहे. पंतप्रधानांचा पीकविमा योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय हा शेतकरी विरोधी असल्याचे राऊत म्हणाले.