महाराष्ट्र

maharashtra

Nitin Desai Suicide Case: देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी एडलवाईजच्या संचालकांना तातडीचा दिलासा नाही, पुढील सुनावणी १८ ऑगस्टला होणार

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एडलवाईजचे संचालक रेशेश शहा आणि इतरांच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली, खालापूर पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची त्यांनी मागणी केली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती एनडब्ल्यू सांबरे आणि न्यायमूर्ती आरएन लड्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पुढील सुनावणी १८ ऑगस्टला होणार आहे.

By

Published : Aug 11, 2023, 11:38 AM IST

Published : Aug 11, 2023, 11:38 AM IST

Updated : Aug 11, 2023, 12:30 PM IST

Nitin Desai Suicide Case
नितीन देसाई आत्महत्या प्रकरण

मुंबई - कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी 2 ऑगस्टला आत्महत्या केल्यानंतर एडलवाईजच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी एडलवाईजकडून मुंबई उच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीच्या अधिकाऱ्यांना तातडीने दिलासा दिला नाही. या प्रकरणी पुढील सुनावणी १८ ऑगस्टला होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने एडलवाईज कंपनीच्या अधिकाऱ्यांना तातडीचा अंतरिम दिलासा देणारा आदेश देण्यास नकार दिला आहे. खंडपीठाने या प्रकरणातील तक्रारदार देसाई यांच्या पत्नीलाही नोटीस बजावली आहे. सरकारी वकील अरुणा कामत पै यांनी न्यायालयात सांगितले की, या प्रकरणातील एफआयआर गेल्या आठवड्यातच नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास अद्याप सुरू आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 18 ऑगस्ट रोजी याचिकांवर सुनावणी करणार असल्याचे सांगितले. त्यावेळेस अंतरिम आदेशांवर विचार करू, असे न्यायालयाने सांगितले.


देसाईंच्या पत्नीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल-नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओसाठी 252 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी मृत्यूपूर्वीच्या ऑडिओ टेपमध्ये कंपनीच्या संचालकांनी कर्ज फेडण्यासाठी दबाव टाकल्याचे म्हटले आहे. कलादिग्दर्शक देसाई यांनी अचानक आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एडलवाईज कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी दबाव असल्याने नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलिसात दिली. त्यावरून खालापूर पोलिसांनी एडलवाईजशी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

आत्महत्येला प्रवत्त केले नसल्याचा कंपनीच्या अधिकाऱ्यांचा दावा-एडलवाईज कंपनीचे संचालक राज कुमार बन्सल, रशेष शाह, केयुर मेहता व जितेंद्र कोठारी या चारही व्यक्तींनी मंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र 4 याचिका दाखल केल्या आहेत. दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, अशी त्यांनी याचिकेत विनंती केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटले, की नितीन देसाई यांना कंपनीने कर्ज देण्यात आले. कंपनीने कर्ज वसुलीसाठी कायदेशीर पद्धतीचा अवलंब केला आहे. आम्ही आत्महत्येसाठी त्यांना प्रवृत्त केले नाही.

नितीन देसाईंनी मृत्यूपूर्वी ओडिओ क्लिपमध्ये काय म्हटले?- नितीन देसाईंनी क्लिपमध्ये म्हटले की, रशेष शाह हा गोडबोल्या आहे. त्याने छोट्या-मोठ्या उद्योजकांसाठी कष्टाने बनवलेला एनडी स्टुडिओ गिळण्याचे काम केले. त्याने 100 फोन करूनही फोन उचलला नाही. दोन-तीन गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी तयार असतानाही मला सहाकार्य केले नाही. स्मित शाह, केयर मेहता, आर. के. बन्सल यांनी स्टुडिओ लुटण्याचे, नाचक्की करण्याचे काम केले आहे. या लोकांनी माझी वाट लावली आहे, अशा शब्दात देसाईंनी निराशा व्यक्त केली आहे.

नितीन देसाईंच्या मुलीचा कंपनीवर गंभीर आरोप- नितीन देसाई यांची मुलगी मानसीने एडलवाईजवर गंभीर आरोप केला आहे. मानसीने म्हटले की, वडिलांनी एका कंपनीकडून 181 कोटी रुपयांपैकी 86.31 कोटी रुपयांची परतफेड केली होती. ते सर्व पेमेंट करणार होते. सहा महिन्यांच्या व्याजाची मागणी केली असताना पवईचे कार्यालय विकून पैसे देण्यात आले. मात्र, कर्ज देणाऱ्या कंपनीने कायदेशीर कारवाई सुरू करताना त्यांना खोटे आश्वासन दिले. कोरोनाच्या काळानंतर स्टुडिओ अडचणीत आला. कर्ज देणाऱ्या कंपनीशी वारंवार भेटण्याचा प्रयत्न करून थोडी सवलत देण्याची मागणी केली.

हेही वाचा-

  1. Nitin Desai Suicide Case : नितीन देसाई आत्महत्या प्रकरण; एडेलवाईजच्या व्यवस्थापकीय संचालकाची आठ तास चौकशी
  2. Nitin Desai death case : नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणीचा गुन्हा रद्द करा- एडलवाईज कंपनीची उच्च न्यायालयात धाव
Last Updated : Aug 11, 2023, 12:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details