मुंबई Warrant Against BJP MLA Nitesh Rane : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात समन्स बजावूनही अनुपस्थित राहणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या नावानं माझगाव दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी जामीनपात्र वॉरंट काढलंय. त्यामुळं आमदार नितेश राणे यांना पुढील सुनावणीच्या वेळी उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे.
नितेश राणेंनी काय केल होत वक्तव्य : खासदार संजय राऊत आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात दररोज कोणत्या ना कोणत्या विषयावरुन आरोप प्रत्यरोप होत असतात. अशातच भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांबद्दल एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप येणार आहे. येत्या 10 जूनपर्यंत संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असं वक्तव्य नितेश राणे यांनी 7 मे रोजी केलं होतं. त्यांच्या या व्यक्तव्यावर आक्षेप घेऊन राऊत यांनी राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. याची दखल घेऊन न्यायालयानं राणे यांना 16 ऑक्टोबर रोजी समन्स बजावून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, मंगळवारच्या सुनावणीला राणे न्यायालयात अनुपस्थित राहिले. त्यामुळं न्यायालयानं राणे यांच्या नावे जामीनपात्र वॉरंट काढलंय.