महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitesh Rane On Sanjay Raut : ... तर संजय राऊतांना त्यांच्या पत्रकार परिषदेत जाऊन प्रश्न विचारणार; नितेश राणेंचा इशारा - नितेश राणेची संजय राऊतांवर टीका

Nitesh Rane On Sanjay Raut: राज्यातील मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यावरून राजकारण तापलेलं असताना भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane warning) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह (foreign tour of state ministers) शिवसेनेच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. (MLA Nitesh Rane) आपण संजय राऊत (Sanjay Raut) यांना त्यांच्या पत्रकार परिषदेत (Nitesh Rane) जाऊन प्रश्न विचारणार असा इशारा त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर (Aditya Thackeray) वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना 'इंडिया' आघाडीमध्ये घेण्यास संजय राऊत यांनी विरोध केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आज (सोमवारी) मुंबईत ते आपल्या निवासस्थानी (Nitesh Rane PC Mumbai) बोलत होते.

Nitesh Rane On Sanjay Raut
नितेश राणेंचा इशारा

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 6:09 PM IST

संजय राऊतांच्या भूमिकेवर टीका करताना नितेश राणे

मुंबईNitesh Rane On Sanjay Raut:याप्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले की, आज सकाळी ईडीच्या चार्जशीटमध्ये सुजित पाटकर यांनी दिलेली माहिती संतापजनक आहे. कोविड काळात कुणाचे आई वडील, काका, कुणाची बायको ज्याचे मृत्यू झाले त्यांच्या नातेवाईकांनी ईडीची चार्जशीट बारकाईने वाचावी. सुजित पाटकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, कोविड काळात कंत्राट मिळवण्यासाठी मी संजय राऊत यांचे नाव वापरायचो. कोविड काळात आमच्या काही भगिनींचे कुंकू पुसले गेले. ज्यांच्या आयुष्यात हे घडलं त्या सर्वांसाठी संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत. हा कुठलाही राजकीय मुद्दा नाही, तर भावनिक मुद्दा आहे. म्हणून ज्यांचे नातेवाईक कोविड काळात गेले त्यांच्या नातेवाईकांनी आता मातोश्रीवर मोर्चा काढला पाहिजे, असेही नितेश राणे म्हणाले.

संजय राऊत यांना प्रश्न विचारणार:आज याविषयी संजय राऊत यांना आमच्या पत्रकार मित्राने प्रश्न विचारला, पण त्याला दम दिला गेला. असे सांगत संजय राऊत यांच्या पुढच्या पत्रकार परिषदेत मी येणार आणि स्वतः प्रश्न विचारणार, असा इशाराही नितेश राणे यांनी राऊतांना दिला आहे.


लंडन दौऱ्याची'आयटनरी'बाहेर काढणार:इंग्लंड मधील वाघनखे भारतात परत आणण्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या मुद्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना त्यांनी वाघनखं का भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्याचबरोबर ते वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर टीका करत आहेत. अशात 'मविआ' काळात डाओस दौरा झाला. त्या दौऱ्यानंतर जो लंडनचा दौरा झाला त्याची माहिती दिली नाही तर फोटो सकट मी दौऱ्याची माहिती देईन. वरून सरदेसाई त्या दौऱ्यात का होते? लंडन दौरा नेमका कुणाच्या पैशाने केला गेला? उद्धव ठाकरे कुटुंब कधी स्वतःचा पैसा खर्च करत नाही. उगाच आमच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करणे बंद करा. तसेच मी आठवड्याभरात आदित्य ठाकरे यांच्या लंडन दौऱ्याची सर्व 'आयटनरी' बाहेर काढणार असल्याचही नितेश राणे म्हणाले आहेत.


प्रकाश आंबेडकरांना राऊतांचा विरोध:त्याचप्रमाणे मुंबईत असलेले हिंदू का कमी होत आहेत, याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले पाहिजे. आज मुंबईत हिंदूंना घर मिळत नाही. मुंबईत रोहिंग्या, बांगलादेशींचे मोहल्ले बनत आहेत. आमच्या एका मराठी बहिणीवर अन्याय झाला. त्याची काळजी भाजपा घेईल. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना 'इंडिया' आघाडीमध्ये घेण्यासाठी संजय राऊत यांनी विरोध केला होता. प्रकाश आंबेडकर यांना घेण्याबाबत जो प्रस्ताव आला होता त्याला संजय राऊत यांनी विरोध केला असल्याचंही नितेश राणेंनी सांगितलं आहे.

हेही वाचा:

  1. MNS Loksabha Election २०२४ : लोकसभेसाठी 'मनसे'ची प्लॅनिंग; 'या' दोन मतदारसंघांवर नजर?
  2. Manipur Violence : मणिपूर हिंसाचारासाठी म्यानमार, बांगलादेशमधील कुकी दहशतवादी जबाबदार, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा दावा
  3. Gandhi jayanti 2023 : राष्ट्रपती, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांनी बापूंना वाहिली श्रद्धांजली, पंतप्रधान म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details