मुंबईNitesh Rane on Sanjay Raut :भाजपाकडं नैतिकता औषधलाही शिल्लक राहिली नसून त्यांच्या नैतिकतेचं ऑडिट होणं फार गरजेचे आहे, असा टोला उबाठा गटाचे खासदार, संजय राऊत यांनी भाजपाला लगावला होता. संजय राऊत यांच्या विधानानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाच्या नैतिकतेविषयी संजय राऊत सारख्या खिचडी चोराचा आरोप असलेल्यांच्या सल्ल्याची गरज नाही, असा हल्लाबोल त्यांनी मुंबईत केला आहे.
65 आमदारावरून 15 वर :शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या नैतिकतेवर भाष्य केलं आहे. भाजपाकडं नैतिकता औषधालाही शिल्लक राहिली नसून त्यांच्या नैतिकतेचं ऑडिट करण्याची गरज असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यांच्या टीकेला भाजपा आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. नैतिकतेचं ऑडिट कुणी करावं याचे नियम असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल संजय राजाराम राऊत वाटेल ते बोलत आहेत. जनतेनं भाजपाला मतदानाच्या रुपात मोठा आशीर्वाद दिला आहे. त्यामुळं भाजपा खासदारांची संख्या 2 खासदारावरून 300 वर पोहचली. तर ठाकरे गटाची संख्या 56 आमदारावरून 15 वर आली आहे. फडणवीस यांचं नागपूरचे महापौर ते आज पर्यंतच्या प्रवासाविषयी जनतेनं ऑडिट केलं आहे. त्यामुळं आम्हाला खिचडी चोरांच्या सल्ल्याची गरज नसल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसंच हिंदुत्वाचं ऑडिट संजय राजाराम राऊत करू शकत नाहीत. कधीतरी तुमच्या कुटुंबात तुमचं काय स्थान आहे? याचंही ऑडिट करा, असंही राणे म्हणाले.