मुंबईNitesh Rane On Maratha Lathicharge :मराठा आरक्षणासाठी जालना येथील अंबडमध्ये उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ विरोधकांकडून जोरात टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले आहेत की, (Jalna Lathicharge) मराठा समाजाचे आजवर ५८ मोर्चे शांतपणे निघाले आहेत. (Nitesh Rane on Maratha Community) मग जेव्हा जालन्यातील या मोर्चावेळी पोलिसांवर दगडफेक मराठा समाजातील तरुणांनी केली असेल, असं मला वाटत नाही. मराठा समाजाला कोण बदनाम करू इच्छित आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई ते बोलत होते. (Defamation of Maratha Community)
मराठा आरक्षण राणे समितीने दिले :याप्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले की, जालनामध्ये काल मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जचे समर्थन कोणीच करू शकत नाही. हा लाठीचार्ज मस्ती करून अधिकाऱ्यांनी केला असेल तर त्यांच्यावर आमचं सरकार कारवाई करणार. मराठा आरक्षण हे राणे समितीनं दिलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी ते टिकवलं. ठाकरे सरकारने तेव्हा कोर्टात चांगला वकील न देता मराठा आरक्षणाची वाट लावली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री असताना मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावून दिले. वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणावर बोलूच नये, असंही नितेश राणे म्हणाले.