उद्धव ठाकरेंबाबत नितेश राणेंचे मत मुंबई : Nitesh Rane :माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकामध्ये नमूद केलेल्या दंगलीला काही लोकांना जबाबदार ठरवले आहे. (Nitesh Rane) काही पुरावे यासंदर्भातील हातात आल्याचे त्यांनी म्हटले असले तरी प्रत्यक्षात याला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत. त्यांना अटक करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
दंगलीसाठी उद्धव ठाकरे जबाबदार? : पुणे येथे झालेल्या दंगली प्रकरणांमध्ये काही राजकीय व्यक्तींचा हात होता, अशा पद्धतीची माहिती माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी आपल्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात नमूद केली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या संदर्भातील काही पुरावे असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या संदर्भात बोलताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी सर्वस्वी उद्धव ठाकरे हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
गोऱ्हे आणि नार्वेकरांचे बॉस उद्धव ठाकरे : मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकामध्ये जर काही उल्लेख केला असेल तर तत्कालीन शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांचे बॉस उद्धव ठाकरे होते. त्यामुळे या सगळ्या मागे उद्धव ठाकरे हेच आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसारच डॉ. नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर हे काम करायचे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये उद्धव ठाकरे यांना अटक करून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी आपण मागणी करत आहोत, असे नितेश राणे यांनी सांगितले. यासंदर्भात आपण डॉ. नीलम गोऱ्हे यांना दोष दिलेला नाही, तर बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात जे म्हटले आहे त्याची लिंक आपण त्यांना पाठवून देतो, असेही राणे यावेळी म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर टीका : दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे सरकार म्हणजे तीन समलैंगिक लोकांचा संसार असल्याची टीका केली होती. याला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांना नेमकं कोणाबद्दल बोलायचं आहे? त्यांना आदित्य ठाकरे, दिनो मोरिया आणि सुरज चव्हाणबद्दल बोलायचे आहे का? त्यांच्या बाबतीतले काही फोटो आपल्याकडे आहेत.
हेही वाचा:
- Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या सभांचा कोणाला बसणार फटका?
- Rahul Gandhi targets Adani Group : 'अदानीं'कडून ३२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा राहुल गांधींचा दावा, अदानी-शरद पवार भेटीबाबत म्हणाले...
- Sanjay Raut News: ...तोच निर्णय 'या' तीन समलिंगींना लागू होतो- संजय राऊत यांचा महायुतीवर निशाणा