मुंबईNitesh Rane On Sanjay Raut : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमंत्रणावरून राजकारण तापलंय. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा भाजपाचा खासगी कार्यक्रम असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तर संजय राऊत यांचा गजनी झाला आहे. अशी टीका भाजपा आमदार, नितेश राणे यांनी केली आहे.
सिद्धिविनायकाचा सातबारा कोणाच्या नावावर: याप्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले की, आमंत्रणावर आम्ही राजकारण केलं असल्याचं राऊत म्हणाले. राऊत यांचा गजनी झाला आहे. भाजपाने प्रभू रामचंद्राला किडनॅप केलं आहे. अशी खालच्या दर्जाची भाषा संजय राऊत करत आहेत. आमच्या देवाला कोणीही किडनॅप करू शकत नाही. यापूर्वी मेट्रो, बाळासाहेब स्मारक भूमिपूजनावेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री असताना का डावलंल? राम मंदिर कार्यक्रमाला बोलवलं नाही, म्हणून हे थयथयाट करत आहेत. ५०० वर्षापासून असलेली इच्छा पूर्ण झाली आहे. हे यांना कळणार नाही. तर अयोध्येचा सातबारा भाजपा एखाद्या उद्योगपतीच्या नावावर करेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
वर्षा बंगल्यावर ११ दिवस होते पुजारी : नितेश राणे म्हणाले की, सिद्धिविनायक ट्रस्टवर आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांना बसवलं होतं. तेव्हा त्यांनी त्याचा सातबारा आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न केला होता का? सिद्धिविनायकचा सातबारा आदेश बांदेकरांच्या निमित्ताने स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावर बोला. तिथे करोना काळात उद्धव ठाकरे आणि सुजित पाटणकर यांच्यासाठी व्हीआयपी दर्शन कसं सुरू होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर गणपती पूजेसाठी सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी ११ दिवस होते. तुम्ही पण काचेच्या घरात राहता याचा विचार करा, असा टोलाही राणे यांनी लगावला आहे.
पापी लोकांना बोलवलं नाही: नितेश राणे पुढे म्हणाले आहेत की, अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनासाठी तुमच्या सारख्या पापी लोकांना बोलवलं नाही. तसंच काँग्रेस नेते राहुल गांधींचा पुन्हा एकदा फ्लॉप शो सुरू होतोय. मणिपूर ते मुंबई भागात काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. संजय राऊतांचा घाम कुठे कुठे गळतो हे गोरेगाव रॉयल फार्मवर समजेल. तसंच उद्धव ठाकरेंचा घाम कधी गळतो हा संशोधनाचा विषय आहे. त्याचप्रमाणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीविषयी बोलताना नितेश राणे म्हणाले की, राज साहेब सातत्याने सामाजिक विषय उचलत असतात. दोघांच्या भेटीने महाराष्ट्र राज्याच्या फायदा होईल.
हेही वाचा -
- 'त्या' डॉक्टर महिलेसोबतचे फोटो दाखवायचे का? नितेश राणेंचा संजय राऊतांबाबत मोठा खुलासा
- ठाकरे गटाच्या नेत्याची मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी, नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले फोटो; सुधाकर बडगुजर यांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण
- ..अन्यथा गाठ मराठ्यांशी; नितेश राणेंचा मनोज जरांगे पाटलांना इशारा